औरंगाबाद - भाजप (BJP) आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांची आणखी एक ऑडिओ क्लिप जोरदार होत आहे. या क्लिपमध्ये लोणीकर महावितरणच्या उपकार्यकारी अभियंताला अधिवेशनाततून एका मिनिटात सस्पेंड करण्याची धमकी देत आहेत. शिवाय साहेब म्हणून सांगितलेल कळत नसेल तर आपल्या कर्माची फळे भोगायला तयार रहा असा इशाराच त्यांनी महावितरणच्या अभियंत्याला दिला आहे. यापूर्वी देखील लोणीकरांच्या अनेक वादग्रस्त क्लिप व्हायरल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी अभियंत्याला दिलेली ही धमकी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Babanrao Lonikar Viral Audio Clip)
नेमके या व्हायरल ऑडियो क्लिप मध्ये काय आहे?
अभियंता - हॅलो
लोणीकर - हॅलो
अभियंता - हा सर..
लोणीकर - गावच्या डीपी बंद करण...बंद करा ना..
अभियंता - बरचस रिकव्हर केलंय...
लोणीकर - तुम्हाला हात जोडून सांगितलं, साहेब म्हणून सांगितलं, मराठी भाषेत सांगितल,वारंवार सरकार सूचना देतेय ,राज्याचे ऊर्जामंत्री उपमुख्यमंत्री सांगतायेत, वीज वितरण कंपनी ने आदेश काढलेत लेखी ,एका डी पी वर एका माणसाने विजेचा बिल भरलं तरी डीपी बंद करायची नाही...
अभियंता - हो सर......
लोणीकर - तुम्ही कुठल्या नशेत आहात.? तुम्हाला मराठी भाषा कळत नाही का आता.? तुम्हाला साहेब म्हणून सांगितलेलं कळत नाही का, आता तुम्ही हे बंद करा ना,लोकांना त्रास का द्यायले? गहू पेरणी ची वेळ आहे,आता ऊस लावणी ची वेळ आहे, केळीला पाणी द्यायची वेळ आहे..
अभियंता -हा...
लोणीकर - सरकार पेक्षा मोठे आहेत का तुम्ही,? राज्याच्या मुख्यमंत्र्यापेक्षा उपमुख्यमंत्र्या पेक्षा ..? - एवढा माज चांगला नाही.. तुम्हाला अधीक्षक अभियान त्यांनी सांगितलं कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं की गावातल्या डीपी बंद करू नका.. आता शेवटची वार्निंग आहे नीट वागा साहेब म्हणून सांगितलं हात जोडून सांगितल,ऐकायचे नसेल मराठी भाषेत सांगितलं तर त्याचे फळ भोगावे लागतील, शेवटचा फोन आहे.. वीज वितरण कंपनी चे तुम्हाला लेखी आदेश.. तुम्ही काय ताजमहाल मध्ये नाही जन्मले, गरिबीतलेच आहेत तुम्ही. अधिवेशनात टाकले तर एका मिनिटात सस्पेंड व्हाल.. ऐकले आता..
अभियंता - हो सर
लोणीकर - बर...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.