Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam Tv
Published On

Petrol Diesel Price : मंगळवारी सकाळी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात आज वाढ झाली असून यूपीपासून बिहारपर्यंत त्याचे दर वाढले. मात्र, तेल कंपन्यांनी दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आज इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात (नोएडा-ग्रेटर नोएडा) पेट्रोल 42 पैशांनी महागून 97 रुपये आणि डिझेल 39 पैशांनी महागून 90.14 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. लखनौमध्ये पेट्रोल 5 पैशांनी महागले असून ते 96.62 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे तर डिझेल 5 पैशांनी वाढून 89.81 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

Petrol Diesel Prices
Maharashtra vs Karnataka : धाडसीपणा सांगू नका, मी सीमावादासाठी...'; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर

बिहारची राजधानी पाटणा येथे आज सकाळी पेट्रोलचे दर 50 पैशांनी वाढून 107.74 रुपये प्रतिलिटर झाले आहे, तर डिझेल 47 पैशांनी महागून 94.51 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गुरुग्राममध्ये आज पेट्रोल 53 पैशांनी महाग झाले आणि ते 97.80 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे तर डिझेल 51 पैशांनी वाढले आणि 90.24 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Prices
Pune Breaking : पुण्यात अग्नितांडव; धायरीत मेणबत्ती कारखाना पेटला

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com