विनोद जिरे
बीड: जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षांपासून खोदून ठेवलेल्या राष्ट्रीय महामार्गचे (National Highway) काम काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे अर्धवट रखडलेले राष्ट्रीय महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनत आहे. याच रस्त्यावर आतापर्यंत शेकडो अपघात झाले असून 32 निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. शेकडो जणांना अपंगत्व आलेले आहे.
जिल्ह्यात तब्बल 11 राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग खोदून ठेवले आहेत. गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम अपूर्ण आहे. त्यामुळे बीडमधील संतप्त नागरिकांनी थेट नितीन गडकरी (Nitin Gadkari) साहेबांना विनंती केलीय. रस्ते होतील, टोल नाका ही लावला जाईल, मात्र या अपूर्ण महामार्गामुळे निष्पाप लोकांचे बळी गेले त्याचे नुकसान कसे भरून निघणार आहे ? असा प्रश्न उपस्थित करत, संबंधित गुत्तेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील महत्वाचा मार्ग (क्र.556) अहमदपूर - अंबाजोगाई -केज -मांजरसुंबा- पाटोदा -अहमदनगर या राष्ट्रीय महार्गावरील अर्धवट कामामुळे नागरिकांची डोकेदुखी बनले आहे. या महामार्गावर आत्तापर्यंत गेल्या अडीच वर्षात जवळपास 200 अपघात झाले आहेत, यात शेकडो निष्पापांचा बळी गेलाय. धूळ आणि रस्त्यावरील खड्डे अचानक वळण रस्ता, दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. गुत्तेदार यांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. यामुळे तात्काळ हा रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
बीड (Beed) तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असलेल्या नेकनूरमध्ये तर अक्षरशः रस्ता खोदून ठेवल्यामुळे मार्केटमध्ये सर्व दुकानात धूळ जात आहे. तसेच वाहतूक कोंडीच्या समस्येचा मोठा सामना करावा लागत आहे. मात्र याकडं आमदार , खासदार, मंत्री यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे गडकरी साहेब तुम्ही रस्ते करून खूप चांगलं काम करत आहेत, मात्र या रखडलेल्या महामार्गाकडे देखील लक्ष द्या. अशी विनंती नागरिक करत आहेत.
हे देखील पहा-
तर या रस्त्याने वाहन चालवताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. तसेच खड्डे चुकवत असताना अनेक वेळा गाडीचा तोल जाऊन अपघात झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता पूर्ण करणाऱ्या कंपनीवर कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांनी केली
तर याविषयी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे म्हणाले की, पाटोदा - ते अंबाजोगाई हा एकूण 170 किलो मीटरचा रस्ता आहे. त्याची किंमत 789 कोटी रुपये असून तो महामार्ग साई बाबा कंस्ट्रक्शन लातूर, एचपीएम कंपनी नाशिक आणि हुले कंस्ट्रक्शन बीड, या 3 कंपन्या करत आहेत. यासाठी गुत्तेदारांना अडीच महिन्याचा कालावधी दिला होता.
मात्र, आता साडेतीन ते पावणेचार महिने झालं, काम सुरू असून आद्यप पूर्ण झाले नाही. तर या दोन वर्षांमध्ये अपघात होऊन 32 जणांचे बळी गेले असून शेकडो जणांना अपंगत्व आले आहे. त्यामुळं संबंधित कंपनीच्या ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं, आणि त्यांच्यावर 302 नुसार सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केलीय.
त्यामुळं गडकरी साहेब रस्ते होतील, टोल लावला जाईल, लोक टोल भरतील, मात्र निष्पापांचे बळी गेले त्यांचं काय ? त्यांना कधी न्याय मिळणार ? असा प्रश्न उपस्थित होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.