Shocking : विहिरीत आढळला २८ वर्षीय महिलेसह दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह, आत्महत्या की घातपात?

Parbhani News : परभणीमधील एका विहिरीमध्ये महिलेसह तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला. या मायलेकांची ओळख पटली असून या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.
Shocking incident
Shocking incidentsaam tv
Published On
Summary
  1. परभणीत २८ वर्षीय महिला आणि तिचा दीड वर्षांचा मुलगा यांचे मृतदेह विहिरीत सापडले.

  2. मायलेकांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  3. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

विशाल शिंदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Parbhani : परभणीमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यातील माणकेश्वर शिवारामध्ये एका विहिरीत महिलेचा दीड वर्षीय मुलासह मृतदेह आढळून आला. महिला आणि तिच्यासोबत असलेल्या मुलाची ओळख पटली आहे. विहिरीत दोघांचा मृतदेह आढळल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीमध्ये ज्या महिलेचा मृतदेह आढळून आला तिचे नाव शारदा भारत पवार असे आहे. महिलेचे वय २८ वर्षे असून तिच्यासोबत ज्या मुलाचा मृतदेह आढळून आला, तो महिलेचा मुलगा आहे. दीड वर्षांच्या मुलाचे नाव आदर्श भारत पवार आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

Shocking incident
Crime : माहेरी गेलेल्या बायकोला गोड बोलून भेटायला बोलवलं, आधी गळा आवळला नंतर चाकूने सपासप वार करत संपवलं

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर शिवारामध्ये २८ वर्षीय शारदा पवार आणि तिचा दीड वर्षांचा मुलगा आदर्श पवार यांचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळून आला. या दोघांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली हे अद्याप अस्पष्ट असल्याचे म्हटले जात आहे. दोघे जिंतूरच्या बामणी येथील रहिवाशी आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Shocking incident
Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, महिला नेत्या करणार अजित पवार गटात प्रवेश

५० हजारांसाठी कंत्राटदाराला मारहाण

बीडमध्ये एका कंत्राटदाराला फक्त ५० हजार रुपयांसाठी अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे कंत्राटदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा पोलिसांनी पीडित कंत्राटदाराचा जवाब नोंदवून घेतला. आता घटनेला दीड महिना होऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचे कंत्राटदार तरुणाने म्हटले आहे. त्याने सर्व पुरावे पोलीस अधीक्षकांकडे सुपूर्त केले आहेत.

Shocking incident
Maharashtra Politics : ...तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार! रोहित पवारांचं सूचक वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com