Parbhani News: प्रसुतीनंतर काही तासातच महिलेचा मृत्यू; एक्सपायर झालेले इंजेक्‍शन दिल्‍याचा आरोप करत नातेवाईकांचा गोंधळ

प्रसुतीनंतर काही तासातच महिलेचा मृत्यू; एक्सपायर झालेले इंजेक्‍शन दिल्‍याचा आरोप करत नातेवाईकांचा गोंधळ
Parbhani News
Parbhani NewsSaam tv
Published On

परभणी : शहरातील इकबालनगर भागातील जिकरीया हॉस्पीटलमध्ये महिलेची प्रसुती झाल्यानंतर काही तासाने महिलेचा मृत्यू (Death) झाल्याची घटना शनिवार (२२ एप्रिल) दुपारी घडली. या घटनेनंतर मयत महिलेच्या भागात नातेवाईकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याचा आरोप करत डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. या प्रकरणामुळे (Parbhani) रात्री नऊ वाजेपर्यंत तणावाचे वातावरण हॉस्पीटलमध्ये होते. (Live Marathi News)

Parbhani News
Sanjay Raut on Government: सरकारचं 'डेथ वॉरंट' निघालं,15 दिवसात सरकार कोसळणार; संजय राऊतांच्या दाव्याने चर्चेला उधाण

परभणी शहरातील वांगी रोड भागात राहणाऱ्या महिलेला प्रसुतीसाठी इकबालनगर येथील डॉ. कौसर जिकरीया यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. प्रसुती झाल्यानंतर सदर महिलेला त्रास होत होता. महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर याबाबतची कल्पना दिली. प्रसूती शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता झाली. मात्र दुपारी तीन वाजेच्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कळताच महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी करीत गोंधळ घातला होता.

Parbhani News
Jalgaon News: शिवसेनेपाठोपाठ मनसेही संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक

हॉस्‍पीटलवर दगडफेक

काही संतप्त तरुणांनी डॉक्टर जिकिरीया यांच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे वातावरण आणखी तापले. जमावाने हॉस्पीटलवर दगडफेक देखील केली. नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान या महिलेला एक्सपायर इंजेक्शन दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आह़े. यावेळी पोलीस देखील रुग्‍णालयात पोहोचले होते. जमाव व पोलीस यातही अनेकदा वाद झाला. पोलिस प्रशासन जमावाला शांत करण्याचे प्रयत्न करीत होते. दरम्यान यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्‍छेदनानंतर यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com