Jalgaon News: शिवसेनेपाठोपाठ मनसेही संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक

शिवसेनेपाठोपाठ मनसेही संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक
Jalgaon News MNS
Jalgaon News MNSSaam Tv

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे मनसेच्यावतीने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार होते. परंतु, त्याआधी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे (Jalgaon) जळगावातले मनसे (MNS) सैनिकही आक्रमक झाले आहेत. (Latest Marathi News)

Jalgaon News MNS
Amravati Accident: दुर्दैवी! ट्रक दुचाकीचा भीषण अपघात; एकाच जागीच मृत्यू

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खारघर येथे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी राजकारण होऊ नये असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे जळगावातील मनसैनिकांनी संजय राऊत यांचा निषेध नोंदवला आहे. पाचोरा शहरातील मनसैनिकांनी आज एकत्र येऊन बैठक घेतली होती. बैठकीत संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

Jalgaon News MNS
Leopard Attack: घरात बसून टीव्ही पाहत असताना बिबट्याने केला हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

पोलिसांनी घेतले ताब्यात

संजय राऊत यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवली नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल; असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. आज चौकात पोहोचल्या नंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com