Parbhani News : परभणीत उबाठा गटाला धक्का; हजारो समर्थक मुंबईला रवाना, शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश

Parbhani News : विधानसभा निवडणूक जवळ येताच परभणीतुन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
Parbhani News
Parbhani NewsSaam tv
Published On

परभणी : आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सध्या पक्ष बदलाचे वारे सुरु झाले आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करू लागले असून परभणी जिल्ह्यातील उबाठा गटातील हजारो कार्यकर्ते शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 

Parbhani News
Sambhajinagar Zp School : जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नाही; संतप्त पालकांनी रोखला महामार्ग

विधानसभा निवडणूक जवळ येताच परभणीतुन शिंदेंच्या (Shiv Sena) शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परभणी तालुक्यातील शिवसेना उबाठा गटाचे खंदे समर्थक तथा कारेगाव येथील सरपंच अप्पाराव वावरे हे शेकडो वाहनांचा ताफा घेऊन आपल्या हजारो समर्थकांना घेऊन मुंबईच्या दिशेने शिवसेनेत प्रवेशासाठी रवाना झाले आहेत. हे सर्व समर्थक २१ ऑगस्टला दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. 

Parbhani News
Dhule Accident : देव दर्शनावरून परतताना काळाचा घाला; कार अपघातात एकाचा मृत्यू, चार जण जखमी

उमेदवारीसाठी करणार मागणी 

शिंदे गटात प्रवेश करणारे अप्पाराव वावरे हे यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे निकटवर्ती पदाधिकारी होते. आता ते शिंदे गटात प्रवेश करत असल्याने शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का असून (Parbhani) परभणी विधानसभेत चूरस वाढणार आहे. प्रवेश केल्यानंतर अप्पाराव वावरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परभणी विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी करणार आहेत. परभणी विधानसभेत उबाठा गटाचे डॉ. राहुल पाटील हे विद्यमान आमदार असून परभणी विधानसभा गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. अश्यातच इतक्या मोठ्या संख्येने आज कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असून डॉ. राहुल पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com