परभणीतील जिंतूरमध्ये घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सिलिंडर लीक झाल्यामुळे स्फोटची माहिती आली आहे. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहेत. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर शहरातील बलसा रोडवरील बालासाहेब डोंब यांच्या घरातील स्वयंपाकघरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. काल सायंकाळच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडर लीक झाल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत परिसरातील नागरिक, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सिलिंडरमुळे लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी अथरक परिश्रम घेऊन विझविली. या आगीत स्वयंपाक घरातील फ्रीज , कपडे यासह अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या घटनेमुळे मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गॅस कंपनीने नुकसान भरपाई द्यावी म्हणून घरमालक डोंबे यांनी मागणी केली आहे.
घटनास्थळी पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, स्थानिक गॅस कंपनीचे मालक आदी मान्यवर मंडळी फिरकलेच नाही म्हणून घरमालक व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
परभणीच्या पूर्णा शहरात फ्रिजमध्ये शार्टसर्किट झाल्याने घराला आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. या लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे घर मालकाचे आर्थिक नुकसान झाले. तसेच या आगीत सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.