Parbhani : उपवासाच्या भगरीतून ग्रामस्थांना विषबाधा; गंगाखेडमध्ये खळबळ

Parbhani Marathi News : परभणी जिल्ह्यात भगर खाऊन विषबाधा झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ हाेत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांच्या घटनांमधून दिसून येत आहे.
8 citizens from gangakhed taluka hospitialised
8 citizens from gangakhed taluka hospitialised saam tv

Parbhani News :

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतील आठ जणांना विषबाधा झाल्याची घटना समाेर आली आहे. या सर्वांवर गंगाखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली.  (Maharashtra News)

परभणी जिल्ह्यात भगर खाऊन विषबाधा झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ हाेत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांच्या घटनांमधून दिसून येत आहे. उपवासानिमित्त गंगाखेड तालुक्यातील पडेगाव दामपुरी आणि टोकवाडी या गावातील काही नागरिकांनी भगर खाल्ली हाेती.

8 citizens from gangakhed taluka hospitialised
Risod Krushi Utpanna Bazar Samiti : 'चिल्लर' कारणामुळं वाशिमपाठोपाठ रिसोडचीही बाजार समिती ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

त्यानंतर ग्रामस्थांना मळमळणे आणि उलट्याचा त्रास जाणवू लागला. सुमारे आठ ग्रामस्थांना गंगाखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या देखरेखी मध्ये या रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

8 citizens from gangakhed taluka hospitialised
Code Of Conduct : युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिका-यासह रेल्वे स्टेशन मास्तर, व्यापा-यावर आचारसंहिता भंग गुन्हा दाखल; नांदेडला माेठा शस्त्रसाठा जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com