नायलॉन मांजाच्या बंदीने गट्टू मांजाची वाढली मागणी

मकरसंक्रांत सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणा निमित्त शहरासह जिल्हात चिमुकल्यापासून ते तरुणापासून सर्वचजण पतंग उडवीन्यास पसंती देतात.
Parbhani News
Parbhani News राजेश काटकर
Published On

परभणी - मकरसंक्रांत जवळ आल्याने आकाशात रंगिबेरगी पतंग (Kite) उडवीन्याची स्पर्धा लागते. एकीकडे नायलॉन मांजा विक्रीला बंदी आहे. तरीही काही ठिकाणी नायलॉन मांजाची चोरीछीपे विक्री होत आहे. मागील काही दिवसांपासून नायलॉन (Nylon) मांजाची जागा गोल्ड गट्टू मांज्याने घेतली आहे. मकरसंक्रांत सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणा निमित्त शहरासह जिल्हात चिमुकल्यापासून ते तरुणापासून सर्वचजण पतंग उडवीन्यास पसंती देतात. (Parbhani Latest News)

हे देखील पहा -

परभणी (Parbhani) शहरासह अनेक ठिकाणी पतंग विक्री व मांजाची विक्री केले जाते मात्र काही जण बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करतात तर नायलॉन मांजाचा एक गट्टू जवळपास एक हजाराला मिळत आहे. तर गोल्ड गट्टू माजा हा चारशे ते पाचशे रुपयाला मिळत असल्याने गोल्ड गट्टू मांजाला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Parbhani News
Beed: वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यावर एमपीडीएची कारवाई

नायलॉन गट्टू हे दिल्ली येथून येतात व महाग पण आहे. या मांज्याची बंदी असल्याने मागणी कमी आहे. तर गोल्ड गट्टू हे स्वस्त असल्याने ग्राहक पसंती देतात. कागदाचे पतंग दहा/वीस/तीस रुपये दराने तर पन्ही पतंग दोन/तीन ते पाच रुपयांचे मिळत असल्याने ग्राहक पन्ही पतंगाला पसंती देतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com