Parabhani News: 'मिशन मराठा २०२४..' हाता पायांवर संदेश लिहित युवकाने संपवले आयुष्य; परभणीतील घटना

Parabhani News: जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन हद्दीतील रेपा या गावात तरुणाने हाता पायावर पेनाने मराठा आरक्षणाच्या मागणीचा संदेश लिहीत आत्महत्या केल्याची घटना घडली.
Parabhani News
Parabhani NewsSaamtv
Published On

Parabhani News:

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सुरू असलेले आत्महत्यांचे सत्र काही थांबत नसल्याचे दिसत आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशन हद्दीतील रेपा या गावात शुक्रवारी १५ डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास तरुणाने हाता पायावर पेनाने मराठा आरक्षणाच्या मागणीचा संदेश लिहीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दत्ता शिवाजी पवार असे या मृत तरुणाचे नाव आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

जिंतूर तालुक्यातील रेपा या गावात काल सायंकाळच्या सुमारास गावातील विवाहित युवक दत्ता शिवाजी पवार (वय 32 रा.रेपा जिंतूर) हा बेशुध्द अवस्थेत रेपा परिसरातील शेतात आढळून आला होता. परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

मृत तरुणाच्या पायावर 'एक असला पाटील मराठा आरक्षण 24 डिसेंबर' तर दोन्ही हातावर 'मिशन मराठा २०२४ आरक्षण २०२३ काय करता 50 मराठा' असा मजकूर लिहिलेला आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व मराठा आरक्षण समन्वय समितीचे माजी सैनिक बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे, यांनी रुग्णालयात धाव घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parabhani News
Yavatmal News: शेतजमिनीचा वाद विकोपाला, दीराचं वहिनीसोबत भयानक कृत्य; १४ दिवसानंतर घटनेचा उगलडा

दरम्यान, बोरी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी घटनेचा प्राथमिक पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. मृताच्या परिवाराने मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मृताच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई- वडील असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Parabhani News
Ethanol Production: इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय अखेर मागे; शेतकरी, कारखानदारांना मोठा दिलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com