सरकार स्थापनेत माझा उंदराचाच काय, खारीचाही वाटा नाही; पंकजा मुंडे अजूनही नाराज

राज्यात शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, शिंदे गटातील ९ तर भाजपमधील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
Pankaja Munde Latest Marathi News
Pankaja Munde Latest Marathi NewsSaam TV
Published On

बीड: राज्यात शिंदे- फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळ विस्तार झाला, शिंदे गटातील ९ तर भाजपमधील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. अशातच रक्षाबंधनाच्या दिवशी माजी आमदार पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती, यावर त्यांनी आजही आपली नाराजी उघड उघड व्यक्त केली आहे. त्यामुळे आता भाजपमध्येही मंत्रिपदाबाबत नाराजी असल्याचे समोर आले आहे.

Pankaja Munde Latest Marathi News
Sanjay Rathod : जो कुणी माझी बदनामी करेल त्याला..., मंत्री बनताच राठोडांनी दिला इशारा

शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापनेत माझा खारीचा काय माझा मुंगीचा देखील वाटा नाही. या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे, अस वक्तव्य भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे यांचा नाराजीचा सूर निघत आहे. आज पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांनी वेगळाच खुलासा केला आहे. सरकार स्थापन झाले याचा आनंद आहे, मात्र मी या प्रक्रियेमध्ये कुठेच नव्हते. त्यामुळे खोट श्रेय मी घेणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

त्यामुळे पंकजा मुंडे मंत्रिपदावरुन नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याअगोदर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिपद न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आता भाजपमध्येही नाराजी समोर आली आहे.

Pankaja Munde Latest Marathi News
Sonia Gandhi: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तिसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह

तुमच्या नावाची चर्चा होती पण मंत्रिपद का दिलं जात नाही ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुंडे म्हणाल्या, 'माझी तेवढी पात्रता नसेल. माझ्यापेक्षा पात्रतेचे लोक असतील. माझी पात्रता वाढेल आणि त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा मला मंत्रिपद देतील. याच्याबद्दल मला काहीही अपेक्षा नाहीत. शिवाय माझ्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत चर्चा होतात. मात्र, माझे कार्यकर्ते आणि मी शांत बसलो आहोत. मी जे काही काम करते ते स्वाभिमानाने करते'असं म्हणत भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी काल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com