छगन भुजबळांनी गोपिनाथ मुंडेंच्या वारसासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर आता पंकजा मुंडेंनी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगेंपुढे मैत्रीचा हात पुढे केलाय...समाजातील दरी मिटवण्यासाठी मनोज जरांगेंनी पुढं यावं, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलंय...
खरंतर 2 वर्षांपासून ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष तीव्र झालाय. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्याचा फटकाही बसला. पंकजा मुंडेंनी अनेकदा मनोज जरांगेंना डिवचलंय.. तर दसरा मेळाव्यातही बीडमधील जातीयवादावरुन पंकजा मुंडेंनी जरांगेंचं नाव न घेता हल्लाबोल केला होता..
मात्र महिनाभरातच पंकजा मुंडेंनी जरांगेंना समाजातील दरी मिटवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय.. या आवाहनाला कारण ठरलंय बीडमधील ओबीसींच्या मेळाव्याकडे पंकजा मुंडेंनी फिरवलेली पाठ आणि त्याच मेळाव्याच्या स्टेजवरुन भुजबळांनी शायरीतून नाव न घेता पंकजा मुंडेंना टोला लगावलेला होता. एवढंच नव्हे तर भुजबळांनी थेट धनंजय मुंडेंनी गोपिनाथ मुंडेंचा वारसा चालवण्याचं आवाहन केलं...
खरंतर छगन भुजबळ आणि गोपिनाथ मुंडेंमधील मैत्री सर्वश्रुत होती.. आता भुजबळांनी गोपिनाथ मुंडेंच्या वारसाविषयी केलेलं वक्तव्य खटकल्यानं पंकजा मुंडेंनी शत्रूचा शत्रू आपला मित्र या तत्वानुसार जरांगेंना आवाहन केलंय का? जरांगेंपुढे मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर भुजबळ पंकजा मुंडेंची समजूत घालणार की ओबीसी आंदोलनात नेतृत्वावरुन पडलेली फूट आणखी वाढत जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.