पालकमंत्र्यांमुळेच बीडचा विकास रखडला; पंकजा मुंडेंची, धनंजय मुंडेंवर टीका

सरकारने पॅकेज जाहीर केल्यानंतर ते किती दिवसात मिळेल? हे देखील जाहीर करावं.
पालकमंत्र्यांमुळेच बीडचा विकास रखडला; पंकजा मुंडेंची, धनंजय मुंडेंवर टीका
पालकमंत्र्यांमुळेच बीडचा विकास रखडला; पंकजा मुंडेंची, धनंजय मुंडेंवर टीकाSaamTV

बीड : बीड जिल्ह्याच्या विकासासाठी इथले पालकमंत्री निधी देत नाहीत, आज जिल्ह्यातील जिल्हा परिषद सर्कल असेल, पंचायत समिती सर्कल असेल, या ठिकाणी प्रचंड विकास कामे रखडला असल्याची टीका भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्यावरती केली आहे. (Pankaja Munde criticizes Dhananjay Munde)

हे देखील पहा -

तसेच पालकमंत्री Guardian Minister त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यांना, पंचायत समिती सदस्यांना देखील निधी मिळत नसल्याच ते यावेळी म्हणाले. त्यामुळे या बीड जिल्ह्यातला Beed District विकास प्रचंड रखडला असं त्या म्हणाल्या. तसेच जोपर्यंत लोकं म्हणतील, लोकं सावरगावघाट येथे येतील, तोपर्यंत त्या ठिकाणी मेळावा होणारचं, मी त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणारचं. असं देखील यावेळी पंकजा मुंडे Pankja Munde म्हणाल्या. त्यामुळं आता हा मेळावा कसा होणार याकडं सर्वांचं लक्ष लागल आहे.

पॅकेज जाहीर केलं पण मिळणार कधी?

पालकमंत्र्यांमुळेच बीडचा विकास रखडला; पंकजा मुंडेंची, धनंजय मुंडेंवर टीका
'रेकॉर्डवर पवारांची एवढी प्रॉपर्टी तर बेनामी किती असेल?' किरीट सोमय्यांचा सवाल

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त Heavy Rain शेतकऱ्यांसाठी For Farmers दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज नुकतच जाहीर केलं आहे. या सरकारच्या घोषणेनंतर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, की याबद्दल मी सरकारचे अभिनंदनCongratulations to government करेल, मात्र संपूर्णता नाही. दहा हजार कोटीचे पॅकेज Package सरकारने दिला आहे. मात्र ते पुरेसं नाही, दुसरी गोष्ट सरकारने हे पॅकेज जाहीर केल्यानंतर किती दिवसात मिळेल? हे देखील जाहीर करावं. या त्यांच्या पॅकेजचं अत्यंत आनंदाने मी स्वागत करते. मात्र हे जर पैसे दिवाळीच्या अगोदर या शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले, तर त्यांची दिवाळी Diwali गोड होईल. माझी विनंती आहे सरकारला हे तात्काळ करावं, आणि हे पॅकेज आणखी थोडं वाढवून द्यावं असही त्या म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com