'रेकॉर्डवर पवारांची एवढी प्रॉपर्टी तर बेनामी किती असेल?' किरीट सोमय्यांचा सवाल

गेल्या चार दिवस पवारांवर इन्कम टॅक्स च्या धाडी सुरू आहेत पण पैशाची टोटल लागत नाही.
'रेकॉर्डवर पवारांची एवढी प्रॉपर्टी तर बेनामी किती असेल?' किरीट सोमय्यांचा सवाल
'रेकॉर्डवर पवारांची एवढी प्रॉपर्टी तर बेनामी किती असेल?' किरीट सोमय्यांचा सवालSaamTV
Published On

पुणे : जरंडेश्वरचे मालक यात मोहन पाटील हे नाव आहे. हे विजया पाटील Vijaya Patil यांचे पती आहेत. नीता पाटील, विजया पाटील या कोण आहेत? मोहन पाटील कोण आहेत? अजित पवार Ajit Pawar सांगतात माझ्या बहिणीचा काय संबंध? बहिणीच्या नावावर अनेक कंपन्या आहेत अजित पवारांच्या नामी-बेनामी कंपन्यांना सहभागी कल्पतरू प्रोमोटर्स Kalpataru promoters ही कंपनी कोणाची? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार अजित पवारांवरती किरीट सोमय्यांनी Kirit Somaiya आपल्या पत्रकार परिषदेत केली आहे. (How much of Pawar's property Question of Kirit Somaiya)

सोमय्या पुढे म्हणाले जरंडेश्वरपासून मालकांपर्यंत पोहोलोचायला मध्ये 27 जण आहेत नामी-बेनामी अशा 57 कंपन्यांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. गेल्या चार दिवस पवारांवर इन्कम Income Tax टॅक्स च्या धाडी सुरू आहेत पण पैशाची टोटल लागत नाही. पुण्यात कुठेही पाहा 7/12 वर पवारांचंच नाव. रेकॉर्डवर On Record Property एवढी प्रॉपर्टी तर बेनामी किती असेल असंही सोमय्या म्हणाले.

जरंडेश्वर चे सभासद येऊन भेटले

27 हजार सभासदांचा कारखाना काढून घेतला मी तेव्हा पासून विचारतोय या कारखान्याचा मालक कोण ? हातातील कागदपत्र दाखवत उच्च न्यायालयाने जरंडेश्वर खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं म्हटलं असल्याचही सोमय्यांनी सांगितलं तसेच याबाबत EOW कडे गुन्हा दाखल तपास सुरू आहे, ED कडे तक्रार आहे. अजित पवारांनी कारखान्याचा स्वतःच अर्थमंत्री म्हणून लिलाव केला आणि स्वतःच्याच कंपनीला कारखाना विकला तो ही बेनामी विकला असही ते म्हणाले.

'रेकॉर्डवर पवारांची एवढी प्रॉपर्टी तर बेनामी किती असेल?' किरीट सोमय्यांचा सवाल
देशात स्त्री शक्तीचा जागर; ST महामंडळाच्या महिला वाहकांना मात्र अन्यायकारक वागणूक

पवारांवरती बेलसिरीज करायला हवी

यश ज्वेल्स ही कंपनी Yash Jewels शेल कंपनी यश ज्वेल्स ही कंपनी 2009 ला सेबीने बोगस ठरवली आता चालू असलेली रेड देशातील सर्वात मोठी आहे. गेली सात दिवस सुरू आहे यावर जर वेब सिरीज Web Series करायची ठरवली तर अजित पवारांनी 300-400 कोटी रॉयल्टी मिळेल. ठाकरे-पवार सरकार घोटाळेबाज सरकार जरंडेश्वरमध्ये अजित पवार आहेत, हे माहिती होतं. पण त्यांच्या बहिणी असतील याची माहिती नव्हती अजित पवारांनी गुरू कमोडीटीज Guru Commodities या कंपनीला ६५ कोटी आतल्या दाराने दिले. हे कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन मला CBI, इनकम टॅक्सचे प्रवक्ते म्हणता, पवारांनी घोटाळ्यावर बोलावे चार घोटाळ्यांचा चार्टर्ड अकाऊंटट एकच अजित पवारांनी यश ज्वेल्सच्या माध्यमातून मनी लाँड्ररिंग केलं असल्याचे गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com