पंढरपूर : वाल्मीक कराड याच्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याचा कारनामा समोर आला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष (अजित पवार गट) रामेश्वर मासाळ यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दोन एकर शेत जमिन खरेदी केल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील शेतकरी नवनाथ प्रकाश व्हरे या शेतकऱ्याने मासाळ यांच्यावर आरोप केला आहे. व्हरे कुटुंबाची गोणेवाडी येथे तीस ते चाळीस एकर शेत जमीन आहे. मात्र सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर मासाळ यांनी शेतकरी नवनाथ व्हरे यांना व त्यांचे वडील प्रकाश व्हरे यांना मारहाण करून १६ जानेवारीला दोन एकर शेत जमिन खरेदी केली आहे.
जबरदस्ती उचलून नेट जमीन खरेदी
तुझ्याकडे तीस - चाळीस एकर शेती आहे. तुला कशाला इतकी जमीन पाहिजे. मला तुझी जमीन दे अशी धमकी देऊन नवनाथ याला मारहाण केली. इतकेच नाही तर त्याला जबरदस्तीने उचलून नेऊन जमिन खरेदी करून घेतल्याचा आरोप नवनाथ व्हरे यांचे वडील प्रकाश व्हरे यांनी केला आहे. दरम्यान मासाळ यांच्या दहशतीमुळे व्हरे कुटुंब भयभीत झाले असून दहा दिवसांपासून ते घरी देखील गेले नाही.
पोलिसात तक्रार दाखल
दरम्यान राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून शेतकरी कुटुंबाला देण्यात आलेल्या त्रासाबाबत आणि जबरदस्तीने जमीन खरेदी केलेल्या या सगळ्या प्रकाराची व्हरे कुटुंबाने मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावर अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. मायबाप सरकारने आणि अजित पवारांनी न्याय द्यावा; अशी मागणी पिडीत व्हरे कुटुंबाने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.