Mahadev Jankar News : तर एनडीएमधून बाहेर पडणार; महादेव जानकरांचा इशारा

तर एनडीएमधून बाहेर पडणार; महादेव जानकरांचा इशारा
Mahadev Jankar
Mahadev JankarSaam tv
Published On

पंढरपूर : आगामी काळात भाजपने जर आमचा विचार केला नाही. तर एकला चलोची भूमिका घ्यावी लागेल; असा इशाराच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष (Mahadev Jankar) महादेव जानकर यांनी भारतीय जनता पक्षाला (BJP) दिलेला आहे. त्यामुळे जानकर एनडीएची साथ सोडणार हे आता स्पष्ट झाले आहे. (Tajya Batmya)

Mahadev Jankar
Jalgaon News : आई– वडीलांशी गप्‍पा मारून वरच्‍या खोलीत गेला; कुटूंब गेले असता फोडला हंबरडा

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राज्यभरात दौरा सुरू केला आहे. आज पंढरपूरमधील संत नामदेव पायरीपासून जनस्वराज्य यात्रेला शुभारंभ केला आहे. २०१४ पासून साथ दिलेल्या घटक पक्षांना भाजपने कुठल्याही सत्ता स्थापनेत विचारात घेतले नाही. त्यामुळे माजी मंत्री बच्चू कडू तर नाराज झाले आहेत. यानंतर आता जानकर यांची वेगळी भूमिका भाजपाला चांगलीच अडचणीची ठरणार आहे. कारण धनगर समाज भाजपच्या विरोधात जाऊन मतदान करू शकतो.

Mahadev Jankar
Buldhana News : जीवंत शेतकऱ्यांना दाखविले मयत; शासना विरोधात शेतकऱ्यांचे तिरडी आंदोलन

भारतीय जनता पक्षाने जर आमचा विचार केला नाही, तर लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा रासप लढवेल. महादेव जानकर हे महाराष्ट्रातील बारामती अथवा परभणीमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. जर त्यांनी बारामतीची जागा लढवली तर भाजप समोर मोठा पेच निर्माण (Pandharpur) होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com