Buldhana News : जीवंत शेतकऱ्यांना दाखविले मयत; शासना विरोधात शेतकऱ्यांचे तिरडी आंदोलन

जीवंत शेतकऱ्यांना दाखविले मयत; शासना विरोधात शेतकऱ्यांचे तिरडी आंदोलन
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत जिवंत असलेल्या शेतकऱ्यांना मयत दाखवून शासनाच्या कर्मचाऱ्यांनी (Buldhana) खूप मोठी घोडचूक केली. यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) शासनाच्‍या विरोधात तिरडी आंदोलन करत निषेध व्‍यक्‍त केला आहे. (Live Marathi News)

Buldhana News
Pimpri Chinchwad Crime News : नागरिकांच्या सतर्कतेमुळे बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला, झटापटीनंतर चाैघे अटकेत, चाैघांचा शाेध सुरु

बुलढाणा जिल्‍ह्यात हा प्रकार समोर आला आहे. जिवंत असलेल्या शेतकऱ्यांना मयत दाखविल्‍याबाबत वर्षभरापासून शेलोडी येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासन शासनाकडे चूक दुरुस्तीसाठी निवेदन दिले आहे. मात्र कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे शेलोडी सारख्या जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही.

Buldhana News
Jalgaon News : आई– वडीलांशी गप्‍पा मारून वरच्‍या खोलीत गेला; कुटूंब गेले असता फोडला हंबरडा

या घटनेचा निषेध म्हणून काँग्रेसचे नेते राम डहाके यांच्या नेतृत्वात शेलोडी येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला. एव्हढेच नव्हे तर शासनाचे तिरडी आंदोलन सुद्धा केले. गावात तिरडीचे मडके पाहून यावेळी शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते. यानंतरही शासनाने या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर आम्ही शेवटपर्यंत आंदोलन करू असा इशाराही यावेळी राम डहाके यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com