Maratha Reservation: 'मराठा आरक्षण टिकणारे दिले तर CM शिंदेंचा फोटो देवघरात ठेवून पूजा करू'

Pandharpur News : 'मराठा आरक्षण टिकणारे दिले तर CM शिंदेंचा फोटो देवघरात ठेवून पूजा करू'
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv
Published On

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेणार नाहीत. यावर आमचा विश्वास आहे. (Maratha Aarkshan) मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले तर आपल्या देवघरात त्यांचा फोटो ठेवून पूजा करू; असे मराठा क्रांती मोर्चाचे (Pandharpur) राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी आज जाहीर केले आहे. (Live Marathi News)

Maratha Reservation
Manoj Jarange Patil News : सरकारकडून कोणत्याही हालचाली नसल्याने पुन्हा उपोषण; जरांगे पाटील यांनी मांडली भूमिका

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने वेळापूर येथील पालखी मैदानावर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी साखळकर यांनी ही घोषणा केली‌. (Maratha Reservation) सरकारने दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Nandurbar News: शेती माल खरेदी होत नसल्याने शेतकरी आक्रमक; सोयाबीन खरेदीसाठी बाजार समितीच्या आवारातच उपोषण

अन्यथा सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल 

राज्य सरकारने मराठा समाजातील तरूणांच्या भावनेचा अंत न पाहता तत्काळ आरक्षण द्यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. त्यानुसार त्यांनी मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे. त्यांचा देवघरात फोटो लावून मराठा समाज पूजा करेल. अन्यथा पुढील काळात सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल; असा गंभीर इशारा धनाजी साखळकर यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com