Pandharpur : गॅस चोरीचे रॅकेट समोर; पंढरपूरच्या टेंभुर्णीत बेकायदेशीर गॅस विक्री विरोधात कारवाई

Pandharpur News : घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु असतो. गॅस सिलेंडरचे ब्लॅक मार्केटमध्ये विक्री करून हा गॅस रिक्षा, गाड्यांमध्ये भरला जात असतो. याचा वापर व्यावसायिक वापरासाठी होत असल्याचे समोर आले आहे
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : घरगुती गॅसचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु असतो. रिक्षा किंवा गाड्यांमध्ये भरण्यासाठी गॅस विक्री करणारी टोळी सक्रिय झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर जवळच्या टेंभुर्णी येथे गॅस चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. येथील जिल्हा परिषदचे माजी सदस्य संजय पाटील यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला असून पोलिसांनी बेकायदेशीर गॅस विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. 

घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु असतो. गॅस सिलेंडरचे ब्लॅक मार्केटमध्ये विक्री करून हा गॅस रिक्षा, गाड्यांमध्ये भरला जात असतो. तर बहुतेकदा याचा वापर व्यावसायिक वापरासाठी होत असल्याचे समोर आले आहे. मात्र पंढरपूरच्या टेंभुर्णी मध्ये गॅसचा वेगळाच काळाबाजार सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात गॅस टॅंकरमधून गॅसची चोरी करून त्याची खासगी व्यवसायिकांना विक्री केली‌ जात होती. 

Pandharpur News
Nandurbar : मरण यातना थांबणार कधी; बांबूच्या झोळीतून रुग्णांना घेऊन १५ किमीची पायपीट

अनेक दिवसांपासून सुरु होती चोरी 

मागील अनेक दिवसांपासून अशा पद्धतीने ट्रॅकरमधून गॅस चोरी करण्यात येत होता. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य संजय पाटील यांच्या निदर्शनास आले होते. यानंतर त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी गॅस चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. टॅंकरमधून गॅस चोरी करून तो खासगी व्यक्तींना विक्री केल्या प्रकरणी राजस्थानमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Pandharpur News
IPL Online Betting : आयपीएल मॅचवर सट्टा; जालन्यातून दोघेजण ताब्यात, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप 

दरम्यान पोलिसांनी सहा हजार रूपयांच्या गॅसची चोरी केल्या प्रकरणी दोघांवर जुजबी कारवाई केली आहे. यामागे गॅस चोरीचे मोठे रॅकेट आहे. दरम्यान गॅस विकत घेणाऱ्या खासगी व्यवसायिकांवर मात्र कारवाई केली नाही. पोलिस अशा प्रकारांना पाठिशी घालत आहेत; असा आरोप पाटील यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com