सागर निकवाडे
नंदुरबार : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या धडगाव तालुक्यातील केलापाणी गावाला स्वतंत्र काळापासून रस्ताच नाही. परिणामी इथल्या आदिवासी बांधवांना दररोज मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. केलापाणी ते कालापाणी या १५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल चार ते पाच तासांची जंगलातून जीवघेणी पायपीट करावी लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आजही सातपुड्यात पाहायला मिळत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील केलापाणी गावात राहणाऱ्या रेंगीता आट्या चौधरी या १८ वर्षीय तरुणीला गेल्या चार ते पाच दिवसापासून पोटाच्या विकाराने प्रचंड वेदना होत होत्या. मात्र गावाकड जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका किंवा इतर वाहन येऊ शकत नव्हते. यामुळे गावातील नागरिकांचे हातपाय जोडत या तरुणीच्या वडिलांनी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली. गावातील तरुणांनी एकत्र येत बांबूची झोळी तयार करत या तरुणीला एक दोन नव्हे तर तब्बल १५ किलोमीटर जंगलातून खांद्यावर घेत मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवल.
जंगलातून प्रवास
मुख्य रस्त्यापासून एका वाहनाने या तरुणीला प्राथमिक उपचार केंद्र तोरणमाळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सामान्य रुग्णालय पोहोचण्यासाठी तब्बल चार ते पाच तासांचा कालावधी लागत असल्याने येथील आदिवासी बांधवांनी रोष व्यक्त केला आहे. रुग्णाला बांबूच्या झोडीतून घेऊन जाण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल आठ ते दहा तरुण लागतात. त्यातच १५ किलोमीटरचा जंगलातून पायपीट खोल दऱ्या उंच डोंगर चढून यासोबतच जंगली प्राण्यांचा सामना करत हा सर्व प्रवास करावा लागतो.
दोन महिन्यातील तिसरी घटना
बांबूच्या झोडीतून जीवघेणा प्रवासाची ही गेल्या दोन महिन्यातील तिसरी घटना आहे. दोन महिन्यापूर्वी एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिची रस्त्यातच प्रस्तुती करण्याची वेळ आली होती. त्याच प्रस्तुतीदरम्यान तिच्या नवजात बालकाचा मृत्यू देखील झाला होता. त्यानंतरच एका तरुणीला यात पद्धतीचे त्रास होत असल्याने तिला बांबूच्या झोळीतून प्रवास करावा लागला होता. आता पुन्हा एकदा कुठल्या तरुणीला रुग्णालय गाठण्यासाठी तासंतास जंगलातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत की परिस्थिती पुन्हा एकदा समोर आलेली आहे.
जगायचं कसे?
स्वतंत्र काळापासून केलापाणी ते कालापानी गावाला जायला रस्ताच नाही. परिणामी येथील आदिवासी बांधवांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहेत. प्यायला पाणी नाही, वीज नाही, रस्ता व आरोग्य सुविधा नाही. शासनाकडे वारंवार मागणी करून देखील रस्ता होत नाही. आरोग्य सुविधा मिळत नाही. यामुळे हतबल झालेल्या आहे आदिवासी बांधवांनी साहेब आम्ही जगायचं कसं असा संतप्त सरकारला विचारला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.