Ashadhi Wari 2023: आषाढी यात्रेनिमित्‍ताने मंदिर समितीचा महत्‍त्‍वाचा निर्णय; विठ्ठल मंदिरात जाताना भाविकांजवळ असेल मोबाईल

आषाढी यात्रेनिमित्‍ताने मंदिर समितीचा महत्‍त्‍वाचा निर्णय; विठ्ठल मंदिरात जाताना भाविकांजवळ असेल मोबाईल
Pandharpur Ashadhi Wari
Pandharpur Ashadhi WariSaam tv
Published On

पंढरपूर : महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्‍या यंदाचा आषाढी पालखी सोहळा येत्या २९ जूनला साजरा होणार आहे. (Ashadhi Wari) आषाढी यात्रे दरम्यान भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता मोबाईल घेवून‌ जाता येणार आहे. तथापी (Pandharpur) मोबाईल वापरास मात्र बंदी कायम ठेवली आहे. (Latest Marathi News)

Pandharpur Ashadhi Wari
Shirdi Sai Baba: साईभक्‍तांना शिफारशीविना मिळेल आरतीची पास; मंदिर प्रवेशासाठी आधारकार्ड आवश्‍यक

आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आषाढी यात्रा काळात भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांना मोबाईल घेवून‌ जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Pandharpur Ashadhi Wari
Nandurbar News: चांदसैली घाट बनला मौत का कुवा; घाटात कुठं दरड कोसळली तर कुठं रस्ता खचलेला

मागील अनेक वर्षांपासून भाविकांना‌ विठ्ठल रूक्मिणी मंदिरात (Vitthal Rukhmini Temple) मोबाईल घेवून जाण्यास बंदी होता. यात्रा काळात मोठी गर्दी असते. अशा‌वेळी संपर्काचे प्रमुख साधन असलेला मोबाईल ठेवण्यासास भाविकांना अडचण येते. भाविकांची ही अडचण लक्षात घेऊन मंदिर समितीने आषाढी यात्रा काळापुरती मोबाईलवरील बंदी मागे घेतली आहे. मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com