Madha News : दिवाळीच्याच दिवशी दुःखाचा डोंगर; माढ्यात ऊस तोडणीसाठी आलेले ४ मजूर बुडाले

Pandharpur News : सर्व मजूर यवतमाळ जिल्ह्यातील असून ऊसतोड करण्यासाठी या भागात आले होते.
Madha News
Madha News Saam tv
Published On

पंढरपूर : पोट भरण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील चार ऊसतोड करणाऱ्या मजुरांचा परिवार माढा तालुक्यात ऊस तोडणीसाठी आले होते. मात्र या कुटुंबावर ऐन दिवाळीच्याच दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नदीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या चार कामगार सीना नदीत बुडाले आहेत. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्न करत असताना नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने चोघांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचा शोध सुरु आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी (Madha News) माढा तालुक्यातील खैराव येथे ही दुर्घटना घडली असून चार ऊसतोड मजूर सीना नदीपात्रात बुडाले आहेत. हे सर्व मजूर यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील असून ऊसतोड करण्यासाठी या भागात आले होते. दरम्यान आज दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून अद्याप या पैकी एकाचाही शोध लागलेला नाही. या दुर्घटनेत शंकर विनोद शिवणकर (वय २५), प्रकाश धाबेकर (वय २६), अजय महादेव मंगाम (वय २५), राजीव रामभाऊ गेडाम (वय २६, सर्व रा. लसणा टेकडी ता. जि. यवतमाळ) हे ऊसतोड मजूर बुडाले आहेत.

Madha News
Satara Crime : धक्कादायक.. कर्ज देत नसल्याचा राग; बँकेत जात मॅनेजरवर कोयत्याने वार

एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चोघे बुडाले 

ऊसतोड कामगारांचे कुटुंब जगदाळे वस्ती, खैराव (ता. माढा) या ठिकाणी आले होते. जवळच सीना नदीवर हे चौघेजण कुटुंबातील इतर सदस्यासह आंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी गेले होते. दरम्यान नदीत उतरलेला शंकर हा प्रथम पाण्यात गेल्यावर बुडायला लागला. त्याला बुडत असल्याचे पाहून प्रकाश त्यास वाचवण्यासाठी गेला असता तोही बुडू लागल्याने इतर दोघेही पाण्यात उतरले. सीना नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चौघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून दोन तासानंतरही अद्याप कोणाचाही शोध लागलेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com