Pandharpur Accident News: सकाळी मॉर्निंग वॉकला निघाली महिला; वाटेतच घडलं विपरीत, आईला पाहून लेकरांनी फोडला टाहो

Accident Of Woman During Morning Walk: रजनी गुंडेवार आज सकाळी सहा वाजनेच्या सुमारास रस्त्याच्या एका बाजूने मॉर्निंग वॉकसाठी फिरत होत्या.
Pandharpur Accident News
Pandharpur Accident NewsSaam TV
Published On

Pandharpur Accident News: मृत्यू कधी आणि कसा चालून येईल याचा नेम कोणीही लावू शकत नाही. पंढरपूर येथून अपघाती मृत्यूची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा दुचाकी अपघातात मृत्यू झालाय. (Latest Marathi News)

या बाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर (Pandharpur) शहरातील गणेशनगर भागात ही घटना घडली. रजनी अनिल गुंडेवार या वृध्द महिलेचा या घटनेत मृत्यू झाला आहे. रजनी गुंडेवार आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्याच्या एका बाजूने मॉर्निंग वॉकसाठी फिरत होत्या.

Pandharpur Accident News
Pandharpur News: स्मशानातून होतेयं मृत व्यक्तीच्या राखेची चोरी! विचित्र प्रकाराने पंढरपुरात खळबळ; धक्कादायक कारण समोर

यावेळी पाठीमागून वेगात येणाऱ्या एका दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार देखील खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.

आरोग्य सुदृढ रहावे, गुडघे दुखणी कमी व्हावी म्हणून रजनी दररोज सकाळी मॉर्निंग वॉक करत होत्या. काळ आपल्यावर अशा पद्धतीने झडप घालेल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्यांच्या निधनाने गुंडेवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळा आहे.

Pandharpur Accident News
Neral Crime News : शिकारीला जंगलात नेलं, डोक्यात गोळी घालून तरुणाला जमिनीत पुरलं; बायकोच्या बॉयफ्रेंडचं भयंकर कृत्य

बुलढाण्यात एसटी बसचा भीषण अपघात; ४५ प्रवासी जखमी

बुलढाण्यात देखील अपघाताची एक मोठी दुर्घटना समोर आलीये. मलकापूर आगाराची एसटी बस बुलढाण्याकडे येत असताना सकाळी सव्वा दहाच्या सुमारास राजूर घाटात असलेल्या मोहेगाव नजीक अपघात झाला आहे. अचानक एसटीचे समोरचे टायर फुटल्याने बस मागे येत असताना ब्रेक देखील फेल झाले. त्यामुळे दहा ते पंधरा फूट बस मागे येऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. बसमध्ये एकूण ५५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी जवळपास ४५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जण गंभीरित्या जखमी असून जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये राजुर, मोताळा, तारखेडा येथील विद्यार्थी हे बुलढाणा (Buldhana) येथे शाळेत येत असताना किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com