Palghar News : पेपर देण्यासाठी गेली ती परतलीच नाही, तब्बल २ वर्षांनी समोर आला 'तो' सेल्फी

दोन वर्षांनी गूढ उकललं
Palghar News
Palghar NewsSaam Tv
Published On

Palghar News : पालघर मधील वैद्यकीय शिक्षण घेणारी 22 वर्षीय विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणात सुमारे दोन वर्षानंतर पोलिसांनी जीवरक्षक मिथू सिंग याला अटक केली. वांद्रे बॅन्ड स्टॅन्ड येथे सिंग यानेच तिला शेवटचे पाहिले होते.

बोईसर मधील सदिच्छा साने ही मुंबईतील (Mumbai) जे.जे महाविद्यालयात एमबीबीएसच्या (MBBS) शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती . मात्र 29 नोव्हेंबर 2021 रोजी शेवटचा पेपर देण्यासाठी गेलेली सदिच्छा घरी परतलीच नाही. या संदर्भात बोईसर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

Palghar News
Maharashtra Politics: स्थानिक आमदारांना संभाजीराजेंचा कडक इशारा; म्हणाले, " गुपचूप प्रशासकीय बैठक लावून...

हा तपास पुढे वांद्रे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सदिच्छा बेपत्ता होऊन १५ दिवस उलटल्यानंतरही तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला. सदिच्छाचा शोध घेण्यासाठी बँड स्टॅन्ड बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले होते.

तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास पुढे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तिचे शेवटचे लोकेशन वांद्रे बँड स्टॅन्ड असल्याने तिच्या कुटुंबियांनी वांद्रे पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती.

Palghar News
Beed Accident : भरधाव वेगात कारची कंटेनरला धडक; भीषण अपघातात भाजप नेत्याचा पुतण्या ठार

आता त्याच रात्रीच्या सुमारासचा एकाच जीव रक्षकासोबतचा तिचा सेल्फी समोर आला होता. मागील दोन वर्षांपासून या प्रकरणाचा संत गतीने तपास सुरु असून जीवरक्षक मिथु सिंग आला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर सदिच्छाच्या कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असल तरी दोषींवर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा सदिच्छाचे कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com