Mokhada News : शाळेपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीं चिखल तुडवीत जातात शाळेत

Palghar News : आम्ही शाळा शिकून चंद्रावर जावू; पण शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत रस्ता तरी द्या; अशी भावनिक साद येथील विद्यार्थ्यांनी सरकारला घातली आहे. एक किमीचा रस्त्याकडे दुर्लक्षित असेल तर खेदाची बाब
Mokhada News
Mokhada NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
पालघर
: आदिवासी परिसर असलेल्या भागांमध्ये आजही पायी जाण्यासाठी चांगले रस्ते नाही. यामुळे चिखलातून वाट काढावी लागत असते. हीच परिस्थिती पालघरच्या मोखाडा तालुक्यातील ठाकूरवाडी येथे समोर आला आहे. येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याचे समोर आले असून चिखलातून मार्ग काढत शाळेत जावे लागत असते. 

पालघर जिल्ह्यात होवू घातलेले हजारो कोटींचे वाढवण बंदर, अगदी बंदुकीच्या वेगाने धावणारी प्रस्तावित बुलेट ट्रेन, मुंबई बडोदरा रस्ता असे अनेक डोळे दिपवणारे प्रकल्प एकीकडे होत आहेत. मात्र मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या ठाकूरवाडी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना निरगुडवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. किमान एक किमीच्या आसपास असलेला या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अक्षरशः पाणी आणि चिखलातून येथील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. 

Mokhada News
Mulshi News : पौड पोलिसांकडून कोर्टाची दिशाभूल; आरोपींच्या वकिलाचा दावा, पोलीस प्रशासनाला कोर्टाची नोटीस

विद्यार्थ्यांची भावनिक साद  

कोट्यवधी रुपयांच्या नुसत्या संरक्षण भिंती बांधल्या गेलेल्या मोखाडा तालुक्यात एक किमीचा रस्त्याकडे दुर्लक्षित राहत असेल तर ही खेदाची बाब आहे. आम्ही शाळा शिकून चंद्रावर, मंगळावर ही जावू; पण शिक्षण घेण्यासाठी शाळेपर्यंत रस्ता तरी द्या; अशी भावनिक साद येथील विद्यार्थ्यांनी सरकारला घातली आहे.

Mokhada News
Hingoli : आणीबाणीत तुरुंगास भोगलेल्यांचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न; हिंगोलीत समोर आला प्रकार

तालुक्यातील ठाकूरवाडी येथील तब्बल १५ ते २० विद्यार्थी हे निरगुडवाडी येथील प्राथमिक शाळेत दररोज चालत जातात. किमान १ ते दीड किमी अंतर असेल यामुळे याठिकाणी बससेवा सुरू असल्याचा संबंध नाही. याशिवाय जिथे चालायला रस्ता नाही तिथे बस जाईल तर कशी? यामुळे दफ्तर पाठीशी घेऊन विद्यार्थी दररोज ये- जा करतात. मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर एक मोरी आहे; येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि चिखल सुद्धा होतो. यामुळे चिखल पाण्याची वाट तुडवत या विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जावे लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com