Palghar Ghost News: छतावर भूत असल्याचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सध्या पालघरमधील (Palghar) समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय. रस्त्यालगत फुटपाथ वर झोपलेला तरुण, वारंवार हवेत उडणारी खुर्ची, कोणीही बसलेलं नसतानाही आपोआप चालणारी सायकल आणि छतावर सफेद पोशाख परिधान करून वारंवार हालचाल करणारी महिला असा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या व्हायरल व्हिडिओतून भूत असल्याचं भासवण्यात येत आहे. मात्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीकडून हे सर्व दावे खोडून काढण्यात आली असून हा तरुणांनी केलेला खोडसाळपणा असल्याचं सांगितलं आहे. (Palghar Latest News)
पालघरमधील कचेरी रोड परिसरात रात्री छतावर भूत असल्याचा दावा करत एक व्हिडिओ (Viral Video) सध्या पालघरमध्ये प्रचंड व्हायरल होतोय. मात्र प्रत्यक्षात हा व्हिडिओ कुठला आहे हे अजूनही स्पष्ट झालं नसलं तरी पालघरमध्ये सध्या याच व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. रस्त्यालगत फुटपाथवर झोपलेला तरुण, अचानक छतावर पांढरे कपडे परिधान केलेले तरुणी, (Ghost) हवेत उडणारी खुर्ची आणि कोणीही बसलेलं नसताना चालणारी सायकल असं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर हा सर्व खोडसाळपणा असल्याच स्पष्ट होतंय. या व्हिडिओत रात्री रस्त्यालगत झोपलेला तरुण त्याच्या पोशाखावरुन रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर झोपणाऱ्यांप्रमाणे वाटत नाही. तसंच त्याच्या पेहरावावरून तो सुशिक्षित आणि आर्थिक सक्षम वाटतोय. व्हिडिओच्या शेवटी झोपलेल्या तरुणाच्या अंगावर अचानक चादर गुंडाळली जात असून या सगळ्यामुळे भीती निर्माण झाल्याने पळून जाणारा तरुण हा निव्वळ देखावा करत असल्याच स्पष्ट होतंय. (Maharashtra News)
हा व्हिडिओ कुठला आहे याची अजूनही कुठलीही स्पष्टता झाली नसली तरी काही खोडसाळ तरुणांनी मनोरंजनाच्या दृष्टीने हा सीसीटीव्ही व्हिडिओ तयार केल्याचं दिसून येत आहे. मात्र लोकांच्या मनात भीती निर्माण होण्याआधीच पालघर पोलिसांनी चौकशी करून सत्यता बाहेर आणावी अशी मागणी ही समाज माध्यमांवर होत आहे .
दरम्यान पालघर पोलिसांच्या सायबर सेलने या सगळ्याची तपासणी करून सत्यता बाहेर आणावी अशी मागणी देखील होऊ लागली आहेत. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, हा व्हिडिओ खोटा असून एडिट करुन व्हायरल केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. काही तरुणांनी हा खोडसाळपणा केला आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.