Jawhar News : हृदय पिळवटून टाकणारी घटना; मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी बाबूंच्या झोळीचा आधार

Palghar News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात असताना जव्हार तालुक्यात ग्रामस्थांना डोलीतून जगावं लागत आहे हा विकासाचा विदारक चेहरा नाही का असा सवाल यावेळी गावकऱ्यांनी उपस्थित केला.
Jawhar News
Jawhar NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
जव्हार
: आदिवासी भाग असलेल्या जव्हार तालुक्यात आजही असुविधांची वानवा पाहण्यास मिळत आहे. प्रामुख्याने रस्ते आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून रस्त्याअभावी रुग्णांना झोळीत टाकून नेण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र मृत्यू झाल्यानंतर एका व्यक्तीला देखील बांबूच्या झोळीतून न्यावे लागल्याची हृदय पिळवूण टाकणारी घटना जव्हार तालुक्यातील चांभारशेत पैकी नारनोली गावात समोर आली आहे. 

पालघर जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा तालुका म्हटले कि असुविधाचा डोंगर. वेगवेगळ्या कारणातून जव्हार मोखाडा तालुका चर्चेत असतो. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आदिवासींच्या विकासासाठी येतो. मात्र कुठेची काटेकोर पणाने हा निधी वापरला जात नाही. यामुळे आजही या तालुक्यातील गावांमध्ये पुरेशा सुविधा पोहचल्या नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. या आदिवासी भागातील गावांमध्ये जाण्यासाठी आजही पक्के रस्त्ये झालेले नाहीत.

Jawhar News
Nashik Crime : शेअर मार्केटमध्ये तोटा; दोघा मित्रांनी निवडला चोरीचा मार्ग, दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

पाड्यापर्यंत जाण्यासाठी झोळीतून नेला मृतदेह 

यात जव्हार तालुक्यातील नारनोली गावामधील महेंद्र लक्ष्मण जाधव यांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यांचा मृतदेह रूग्णालयातून गावी नेण्यासाठी गाडी गावापर्यंत जाईल असा रस्ता नव्हता. यामुळे मुख्य रस्त्यापर्यंत मृतदेह रुग्णवाहिकेतून आणण्यात आला असताना या रस्त्यापासून गावातील पाड्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क मृतदेह झोळीतून घेऊन जाण्याची वेळ येथील नागरिकांवर आली होती. 

Jawhar News
Beed : सत्तेचा मलिदा मिळाल्यावर लाडक्या बहिणी अपात्र असल्याचा साक्षात्कार; शरद पवार गटाच्या हेमा पिंपळे यांचा आरोप

घटनेने ग्रामस्थ संतप्त 

या घटनेने ग्रामस्थांमध्ये आक्रोश पसरला आहे. गावकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित केला गेला असून मृतदेहासाठी ही डोली, जिवंतांसाठी ही डोली. मग आमच्या आयुष्य काय कामाचे. गुरेढोऱ्यांपेक्षा ही खराब दिवस आदिवासी जगत आहे. सरकारने तात्काळ या पाड्याला रस्त्याची सुविधा करून द्यावी; या मागणीसाठी अनेक वेळा शासन दरबारी पत्रव्यवहार केले जाते. मात्र अद्याप ही रस्ता उपलब्ध झाला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com