हिंदू-मुस्लीम वादाच्या आगीत तेल ओतणारी घटना, हिंदू मुलीला जबरदस्ती नमाज पठण करायला लावलं

Palghar college ragging case : पालघर जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये हिंदू विद्यार्थिनीला जबरदस्ती नमाज पठण करायला लावल्याचा आरोप समोर आला आहे. रॅगिंगमुळे धार्मिक तेढ वाढल्याचा आरोप असून पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल केला आहे.
Palghar college ragging case
Palghar college ragging case
Published On

हिंदू-मुस्लीम वादाच्या आगीत तेल ओतणारी घटना, हिंदू मुलीला जबरदस्ती नमाज पठण करायला लावलं

हिंदू-मुस्लीम वादाच्या आगीत तेल ओतणारी घटना पालघरमध्ये घडलीय. पालघरच्या कॉलेजमध्ये नेमकं काय घडलं ? कॉलेजमध्ये धार्मिक तेढ वाढवणा-या घटनेवरचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया...

देशाला धार्मिक धृवीकरणाचा आखाडा बनवला जात असतानाच आता पालघरमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय.. पालघर जिल्ह्यातील कॉलेजमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीवर रॅगिंग केल्याचं उघड झालंय.. रात्रीच्या वेळी काही मुस्लीम मुलींनी एका हिंदू मुलीला नमाज पठण करायला सांगत रॅगिंग केल्याची घटना समोर आलीय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलींविरोधात गुन्हा दाखल केलाय...

Palghar college ragging case
BJP AIMIM alliance : राज्याच्या राजकारणात ट्विस्ट, भाजपनं केली एमआयएमशी युती, ठाकरेंनाही घेतलं सोबत, वाचा नेमकं काय घडलं

मात्र या नमाजसाठी कशा पद्धतीनं रॅगिंग केली.. त्याची माहितीच पीडितेनं दिलीय..

पालघरमधल्या वाडा तालुक्यातील पोशेरीतील कॉलेजमध्ये फिजिओथेरपीसाठी प्रवेश

पीडित विद्यार्थिनी कॉलेजच्या होस्टेलमध्ये इतर मुलींसह राहात होती

रविवारी रात्री 11 च्या सुमारास इतर मुलींना हिंदू मुलीला जबरदस्ती नमाज पठण करायला लावलं

घाबरलेल्या पीडितेनं घटनेची माहिती पती आणि वडिलांना सांगितली

कॉलेजकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर प्रशासनाने हात झटकले

पीडितेनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर घटनेचा पर्दाफाश झाला

Palghar college ragging case
Hidayat Patel Murder Case: काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची मशिदीबाहेरच हत्या, आरोपी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष, काँग्रेसच्या २ नेत्यांवरही गुन्हा

खरंतर अँटी रॅगिंग कायदा 1999 नुसार प्रत्येक कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग सेल स्थापन करण्याचे आदेश सरकारने दिलेत... मात्र त्यानंतरही महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी रॅगिंगविरोधी कायदा धाब्यावर बसवून रॅगिंगचे प्रकार सुरुच ठेवलेत.. त्यात महाराष्ट्रात 2024 मध्ये 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.. आता मुस्लीम विद्यार्थिनींनी एका विद्यार्थिनीवर नमाजसाठी रॅगिंग करुन धार्मिक वादाच्या आगीत तेल ओतलंय.. त्यामुळं धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटना आणि रॅगिंग करणाऱ्यांना रोखण्यासाठी आणखी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.. एवढंच नाही तर रॅगिंगची तक्रार करुनही दखल न घेणाऱ्या कॉलेजवरही कारवाई करण्याची गरज आहे.

Palghar college ragging case
BMC Election : आयोगाचा भाजपला जोरदार धक्का, ऐन निवडणुकीत परवानगी नाकारली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com