Chhatrapati Sambhajinagar News: पैठण बाजार समितीच्या निवडणुकीत राडा, काँग्रेसच्या दोन गटात तुफान हाणामारी

Latest News: या राड्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Paithan Rada
Paithan Rada Saam Tv
Published On: 

Paithan News: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर ( (Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Election)) आता पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ( (Paithan Krushi Utpanna Bazar Samiti Election) राडा झाल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेसच्या (Congress) दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Paithan Rada
Badalapur Crime News: दोन दिवसांत गूढ उकललं! बदलापूरमध्ये विवाहितेची पतीनेच केली निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर...

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून काँग्रेसच्या दोन गटात हाणामारी झाली आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्येच गटबाजी झाल्याने दोन गट तयार झाले आहेत. हे दोन्ही गट आमने-सामने येत त्यांच्यामध्ये राडा झाला. आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यामुळे या दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Paithan Rada
Arjun Tendulkar: बापाला ही जमलं नाही ते लेकानं करून दाखवलं! अर्जुनने असं केलं तरी काय?

पैठणच्या बाजार समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दोन गट तयार झाले आहेत. यामध्ये एक गट महाविकास आघाडीसोबत आहे. तर दुसरा गट स्वतंत्र पॅनल तयार करून निवडणुकीत उतरला आहे. यात प्रचारासाठी शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे उमेदवार बाबासाहेब पवार, निवृत्ती पोकळे, ज्ञानेश्वर पवार हे इंदेगावमध्ये गेले होते. त्यावेळी दोन्ही गटात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारी झाली.

Paithan Rada
Arjun Tendulkar: बापाला ही जमलं नाही ते लेकानं करून दाखवलं! अर्जुनने असं केलं तरी काय?

काँग्रेसचे विनोद तांबे, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या समर्थकांनी धारदार शास्त्राने हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या हल्लायमध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Paithan Rada
Mumbai Local Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

दरम्यान, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी दरम्यान देखील मोठा वाद निर्माण झाला आहे. या निवडणुकीत इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर (Congress MLA Hiraman Khoskar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विरोधी पॅनलचा प्रचार करत असल्याच्या कारणावरुन त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. या प्रकरणाता तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.