Asaduddin Owaisi: महाराष्ट्राच्या राजकारणात ओवैसींची एण्ट्री एमआयएमचा डोळा कुणाच्या मतांवर?

Asaduddin Owaisi Targets Muslim-Dominated: धार्मिक धृवीकरणाच्या पार्श्वभुमीवर ओवैसींनी महाराष्ट्रात वातावरण तापवायला सुरुवात केलीय.. मात्र ओवैसींचा नेमका मेगाप्लॅन काय आहे? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओवैसी कुणाचं गणित बिघडवण्याची शक्यता आहे?
Asaduddin Owaisi addressing a rally in Maharashtra, signaling AIMIM’s fresh political push ahead of civic elections
Asaduddin Owaisi addressing a rally in Maharashtra, signaling AIMIM’s fresh political push ahead of civic electionsSaam Tv
Published On

देशात आय लव्ह मोहम्मद विरुद्ध आय लव्ह महादेव वादामुळे धार्मिक धृवीकरण होत असतानातच याच वादाच्या पार्श्वभुमीवर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने एण्ट्री केलीय... एवढंच नाही तर मुस्लिमांच्या एकजुटीचा नारा देतांनाच ओवैसींनी भाजपला हरवण्याचा निर्धार केलाय.

खरं तर राज्यात धार्मिक धृवीकरणाचे प्रयोग सुरु असतानाच ओवैसींनी आधी कोल्हापूर, इचलकरंजी, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये सभांचं आयोजन केलंय.. मात्र ओवैसींचा महाराष्ट्र पिंजून काढण्यामागे नेमका काय प्लॅन आहे?

ओवैसींचं मिशन महाराष्ट्र

राज्यातील मुस्लीम बहुल शहरांवर ओवैसींचा डोळा

निर्णायक मुस्लीम मतांच्या आधारे महापालिका लढवण्याचे संकेत

प्रस्थापित पक्षांनी निराशा केल्यानं साथ देण्याचं आवाहन

मुस्लीम समाजातून नेतृत्व उभं करण्यासाठी खेळी

कोल्हापूर, मिरज, मालेगाव, संभाजीनगर अहिल्यानगर भागात सुनियोजित दौरे

खरंतर एमआयएमने 2014 मध्येच महाराष्ट्र विधानसभेत मुसंडी मारली.. छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि मालेगावमध्ये हातपाय पसरले. एवढंच नाही तर त्यानंतर संभाजीनगर, अमरावती, मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर आणि धुळे या महापालिकांमध्ये जम बसवला.. तर 2019 च्या लोकसभेला प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या साथीने इम्तियाज जलील विजयी झाले.. त्यानंतर धुळे, मालेगावमध्येही आमदार विजयी झाले.. आता भाजपने बटेंगे तो कटेंगे नारा दिल्यानंतर धार्मिक धृवीकरणाच्या लाटेवर स्वार होऊन एमआयएम पूर्ण ताकदीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे... मात्र त्याचा फरक पडणार नसल्याचं मत भाजपनं व्यक्त केलंय..

मालेगाव, धुळे, सोलापूर, नांदेड, बीड, संभाजीनगर, पुणे, ठाणे, अमरावती या धार्मिकदृष्ट्या संवेदनशील शहरात ओवैसी ताकद वाढवण्याची रणनीती आखत आहेत.. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धार्मिक धृवीकरण झालं तर ओवैसींना आयताच फायदा मिळण्याची शक्यता आहे... मात्र पुरोगामी महाराष्ट्रातील मतदार धार्मिक धृवीकरणावर स्वार होणार की महाराष्ट्राचं पुरोगामित्व कायम जपणार? यावर ओवैसी नेमकं कुणाचं गणित जमवणार आणि कुणाचं बिघडवणार, हे स्पष्ट होणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com