Maharashtra Politics: मोर्चात ठाकरेंची बडवा-बडवीची भाषा, ठाकरेंची एकी, महायुतीला धडकी?

Raj And Uddhav Thackeray: निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षांनी एकीची वज्रमूठ आवळली... मात्र या मोर्चात खरी चर्चा रंगली ती ठाकरेंचीच...मात्र मोर्चा ठाकरेंभोवतीच फिरण्याची नेमकी कारणं काय आहेत? आणि ठाकरे बंधूंनी कार्यकर्त्यांना काय आदेश दिलेत?
Raj and Uddhav Thackeray walking together during the “Satyacha Morcha” protest in Mumbai — symbolizing a rare show of unity in Maharashtra politics.
Raj and Uddhav Thackeray walking together during the “Satyacha Morcha” protest in Mumbai — symbolizing a rare show of unity in Maharashtra politics.Saam Tv
Published On

व्होटचोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांनी एकीची वज्रमूठ आवळली.. मात्र या मोर्चात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले ते म्हणजे ठाकरे बंधू... आणि त्याची चर्चा सुरु झाली ती राज ठाकरेंनी मोर्चाला जाण्यासाठी लोकलच्या निवडलेल्या पर्यायामुळे... राज ठाकरे दादरहून चर्चगेट लोकलने मोर्चासाठी पोहोचले..

मात्र थेट मोर्चाच्या ठिकाणी जाण्याआधी राज ठाकरे हॉटेलवरच उद्धव ठाकरेंची वाट पाहत थांबले... एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंसोबत तब्बल तासभर बंद दाराआड चर्चा करत रणनीती ठरवली आणि दोघे भाऊ एकत्रच रस्त्यावर उतरले... याच ठाकरे बंधूंच्या एकीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.. तर आम्ही तुमच्यासाठी एकत्र आलो आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना साद घातलीय..

विरोधकांच्या मोर्चात ठाकरे फक्त एकत्रच दिसले नाहीत.. तर दोघांनीही आक्रमक भूमिका घेत दुबार आणि तिबार मतदान करणाऱ्यांना बडवण्याचा इशारा दिलाय... खरंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी हिंदीसक्तीविरोधात एकीची वज्रमूठ आवळली.. त्यानंतर 4 महिन्यात ठाकरे 10 वेळा एकत्र आलेत... त्यामुळे महायुतीला धडकी भरलीय.. आता व्होटचोरीचा मुद्दा काँग्रेसच्या हातातून निसटून ठाकरे बंधूंच्या हातात गेलाय. त्यामुळे महापालिका निवडणुकीत व्होटचोरीचा मुद्दा ठाकरे बंधूंसाठी फायद्याचा ठरणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com