हरिनाम सप्ताहाच्या रिंगण सोहळ्याला विरोध; वारकरी, पोलिसांमध्ये वाद

हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या रिंगण सोहळ्यावरुन वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे.
Warkari
Warkariसंभाजी थोरात
Published On

कोल्हापूर : प्रतिपंढरपूर (Prati Pandharpur) समजल्या जाणाऱ्या नंदवाळ (Nandwal) येथील हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या रिंगण सोहळ्यावरुन वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. हरिनाम सप्ताहनिमित्त आयोजित रिंगण सोहळा भारत बटालियनच्या आरक्षित जागेत घ्यायचा आग्रह वारकऱ्यांनी केला होता मात्र भारत बटालियनने (Bharat Battalion) या रिंगण सोहळ्याला विरोध केल्याने हा वाद चिघळल्याने पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये (Warkari) धक्काबुक्की झाली.

Warkari
आमदारांच्या घरांना शरद पवारांचा विरोध; आघाडी सरकारला घरचा आहेर (पहा Video)

दरम्यान नियोजन आणि पोलिसांच्या मध्यस्तीमुळे हा वाद निवळला, मात्र नंदवाळमध्ये तणावाची परिस्थिती कायम आहे. कोल्हापूरपासून (Kolhapur) अवघ्या 12 किलोमीटरवर असलेले प्रतिपंढरपूर नंदवाळ हे एक धार्मिक स्थळ आहे. या गावाला विठ्ठलाच्या वास्तव्याने महत्त्व प्राप्त झाल्यामुळे या गावास प्रतिपंढरपूर असे संबोधतात. येथील हेमांडपंती दगडी मंदिरात विठ्ठल रोज वास्तव्यास असतो, अशी आख्यायिका सांगितली जाते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com