ST Bus : अहमदनगरमधील अकोले तालुक्यात धावताय अवघ्या 38 बसेस; आदिवासी भागातील बससेवा विस्कळीत

पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहिबाई पोपेरे यांच्या कोंभाळणे गावची बससेवा देखील बंद आहे.
St Bus
St BusSaam tv

>> सचिन बनसोडे

अहमदनगर : कळसुबाई शिखर, भंडारदरा धरण यासह निसर्गाचे वरदान लाभलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला महाराष्ट्राची पाँडेचरी म्हणून ओळखले जाते. मात्र याच अकोले तालुक्यात आदिवासी तसेच दुर्गम भागातील बससेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अकोले आगारात अवघ्या 38 बसेस उपलब्ध असून अपुऱ्या बससेवेमुळे अनेक गावांच्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यात पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहिबाई पोपेरे यांच्या कोंभाळणे गावची बससेवा देखील बंद आहे. (Maharashtra News)

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून लालपरीकडे बघितलं जातं. ग्रामीण भागातील लोकांचे दळणवळणाचे हेच मुख्य साधन मानलं जातं. एसटी बसमुळे गाव खेड्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आणि विद्यार्थ्यांना एसटी बसचा फायदा होतो. आदिवासी आणि दुर्गम भागात सेवा देणाऱ्या अकोले आगाराकडे कोरोनापूर्वी 63 बसेस होत्या. मात्र कोरोनाची दोन वर्षे बससेवा विस्कळीत झाली ती आजतागायत पूर्वपदावर आली नाही.

St Bus
'जगदंब' तलवार पुन्हा भारतात आणण्याच्या हालचालींना वेग, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

अनेक बस स्क्रॅपमध्ये गेल्याने आज घडीला अकोले आगाराकडे अवघ्या 38 बसेस उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक गावांची बससेवा पूर्णपणे बंद करण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे. फोफसंडी, बदगी, पाचपट्टा या दुर्गम गावांसह पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहिबाई पोपेरे यांच्या कोंभाळणे गावात सुद्धा एसटीची सेवा गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे.

St Bus
Deepali Sayyed : आज तुझा मेकअप उतरलाय, दिपाली सय्यद यांच्याविरुद्ध पुण्यात महिला शिवसैनिकांचा संताप

कोरोना संकट गेल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाले मात्र अकोले तालुक्यातील बससेवा अद्यापही सुरळीत झाली नाही. दुर्गम भागातील रहिवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली आहे. तर ज्यांनी देशी बियांच्या संवर्धनाचे करून अकोले तालुक्याचे नाव जगभरात गाजवले आणि ज्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री, नारीशक्ती तसेच देशभरात विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय त्या राहीबाई पोपेरे यांना सुद्धा उपचार घेण्यासाठी मोठी कसरत करत दुसऱ्यांच्या दुचाकीवरून जावं लागतं. बससेवा पूर्ववत व्हावी आणि महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी, अशी अपेक्षा राहिबाईंनी शासनाकडे व्यक्त केली.

Edited By- Pravin Wakchoure

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com