Onion Farmers: कांदा उत्पादकांना कोट्यवधींचा फटका; निर्यात शुल्कानं बळीराजाला रडवलं

Export Duty On Onion: कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. निर्यात शुल्कात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.
 Onion  Rate
Export Duty On OnionGoogle
Published On

गेल्या तेरा दिवसांपासून कांद्याचे तीन तेरा वाजले आहेत. कारण कांद्याचे दर निम्म्याहून अधिक घसरले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याची मागणी जोर धरू लागलीय. एकट्या पिंपळगाव बाजार समितीत कांदा उत्पादकांना २२ कोटींचा फटका बसलाय. कांद्याच्या घसरलेल्या दरावरचा हा विशेष रिपोर्ट.

गेल्या काही वर्षांपासून कांद्याचं रडगाणं सुरु आहे. कधी निर्यात बंदी तर कधी निर्यात शुल्काचा फटका कांदा उत्पादकांना बसतोय. सध्या कांदा पिकावर 20 टक्के निर्यात शुल्क आकारलं जातंय. त्यामुळे कांद्याची निर्यात मंदावली आहे. नाफेड आणि NCCF नं खरेदी केलेला कांदा आता बाजारात येतोय. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. नाशिक जिल्ह्यात तेरा दिवसांमध्ये दर दिवशी साडेसात कोटींचा फटका बसतोय.

पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात सुमारे दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. 30 क्विंटलच्या ट्रॉलीमागे शेतक-यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान झालं आहे. अशा नुकसानीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं नाही तर नवल. कर्ज काढून कांदा लागवड केलेल्या सिन्नरच्या या शेतकऱ्यानं सत्ताधाऱ्यांना काय विनंती केली आहे पाहा.

 Onion  Rate
Nashik Farmer : बायकोचे दागिने गहाण ठेवून कांदा पिकवला, पण भावच मिळाला नाही; रडत रडत शेतकऱ्याने घेतली मोठी शपथ

अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटामुळे कांद्याचे उत्पादन आधीच घटलंय. सध्या बाजारात येणाऱ्या लाल कांद्याची टिकवण क्षमता अवघ्या काही दिवसांचीचं असल्यानं कवडीमोल भावात कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आलीये.

दोन आठवड्यात कांद्याचा भाव कसा घसरत गेला ते पाहूया.

असा घसरला कांद्याचा भाव

किमान कमाल सरासरी

9 डिसेंबर सोमवार7004,2763,400

11 डिसेंबर बुधवार5003,9013,000

16 डिसेंबर सोमवार5002,4941,950

18 डिसेंबर बुधवार4002,4001,500

19 डिसेंबर गुरुवार3002,1901,400

21 डिसेंबर शनिवार4002,3991,500

23 डिसेंबर सोमवार4002,1251,350

 Onion  Rate
Egg Price Hike : थंडीत महागली अंडी! आता डझनाला ८० ते ८५ रुपये मोजावे लागणार

लोकसभा निवडणुकीत राज्यात कांदा पट्ट्यातील नाराजीचा फटका महायुतीला बसला होता. मात्र मतदारांनी विधानसभेत महायुतीला भरूभरून मतदान केलं. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार रडणाऱ्या कांदा उत्पादकांचे अश्रू पुसण्यासाठी काय निर्णय़ घेणार याकडे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com