Accident: इचलकरंजीत तीन गाड्यांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू

नगरपालिकेजवळ असणाऱ्या स्टेशन रोडवर तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला.
Accident
Accident Saam Tv
Published On

कोल्हापूर: इचलकरंजी शहरातील अटल बिहारी चौकामध्ये, नगरपालिकेजवळ असणाऱ्या स्टेशन रोडवर तीन गाड्यांचा विचित्र अपघातामध्ये (Accident) एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मनोज मोरया असं आहे. या अपघातात तिनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

इचलकरंजी शहरातील स्टेशन रोडवर असणाऱ्या अटलबिहारी चौकामध्ये नगरपालिकेजवळ बोअरवेल्स गाडी डेक्कन चौक मार्गे जात होती. तर मनोज मोरया हे मोटर सायकल वरुन जात होते. यावेळी त्यांच्या मोटारसायकलला जारोची धडक दिली. यानंतर या बोरवेल गाडीने समोरून येणाऱ्या एका इंडियाला गाडीलाही जोराची धडक दिली.

Accident
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडे उत्तर नव्हतं म्हणून त्यांनी भावनिक भाषण केले - फडणवीस

या अपघातात (Accident) मोटार सायकल वरील मनोज मोरया यांचा जागीच मृत्यू झाला. बोरवेल गाडी जागेवर पलटी होऊन मोठे नुकसान झाले आहे. इंडिका गाडीतील चौघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात इतका मोठा होता की दोन्ही गाड्या पलटी झाल्या आहेत, जखमींना खासगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com