
Samruddhi Highway Accident: ०१ जुलै २०२३ रोजी समृद्धी महामार्गावर अतिशय भीषण असा अपघात घडला होता. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणारे खाजगी प्रवासी बस एका छोट्या पूलाला धडकून या बसला आग लागली होती. या आगीत झोपेत असलेल्या २५ प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळेस घटनेने संपूर्ण देश हळहळला होता.
घटनेचं गांभीर्य बघता तात्काळ तात्कालीन एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदतही जाहीर केली होती. मात्र दीड वर्ष होऊनही मृतकांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नसल्याचा आरोप करत , या वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील मृत प्रवाशांच्या नातेवाईकांनी काल सायंकाळी थेट धडक दिली ती सिंदखेडराजा पोलीस स्थानकात.
पोलीस स्थानकाच्या आवारात अपघात ग्रस्त बस अद्यापही उभी असल्याने या बसकडे बघून अक्षरशः हे नातेवाईक घायमोकलून रडले. अद्यापही या प्रवासी बसच्या मालकावर किंवा चालकावर कुठली कारवाई झाली नसल्याने व सरकारने जाहीर केलेली मदतही मिळाली नसल्याने या घटनेतील मृत प्रवाशांचे नातेवाईक वर्धा आणि यवतमाळ येथून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या घटनास्थळी मुक आंदोलन सुरू केल आहे.
काल रात्रीपासूनच हे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आहेत आणि आज सकाळपासून अपघात स्थळी हे नातेवाईक मूक आंदोलनाला बसले आहेत. जोपर्यंत सरकार या बस चालकावर व मालकावर ठोस कारवाई करत नाही व जाहीर केलेली मदत देत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशी भूमिका या नातेवाईकांनी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.