Buldhana: एमआयएमच्या वतीने रस्त्याच्या खड्यात झाडे लावून निषेध आंदोलन...

या आंदोलनात स्थानिक रहिवासी व एआयएमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Buldhana News
Buldhana NewsSaam Tv

बुलडाणा - शहरातील डॉल्फिन रोडवरील बालाजी नगर तसेच खलिद बिनवलीद नगर मधील नागरिकांच्या वापरात येणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करिता बुलडाणा (Buldhana) एमआयएमच्या (MIM) वतीने रस्त्याच्या खड्यात बेशरमचे झाडे लावून प्रशासना च्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

हे देखील पाहा -

अनेक दिवसांपासून डॉल्फिन रोडवरील बालाजी नगर तसेच खलिद बिनवलीद नगर मधील नागरिकांच्या वापरात येणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली. मात्र कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान या भागातील नागरिकांनी एकत्रित येऊन पैसे गोळा करून स्वखर्चाने रस्त्यात झालेल्या खड्यात दहा ट्राल्या मुरूमच्या आणून टाकल्या तरी देखील रस्त्यातील खड्डे बुजले गेलेले नाहीत.

Buldhana News
Chandrapur: पूरग्रस्त गावांच्या पाहणीकरिता केंद्रीय पथक चंद्रपूरात दाखल; नऊ गावांची पाहणी

पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा रस्ता त्वरित तयार करण्यात यावा. अशी मागणी घेवून एमआयएमच्या वतीने रस्त्यांच्या खड्ड्यात बेशरम झाडे लावून निषेध आंदोलन करण्यात आले. हा रस्ता त्वरित तयार न झाल्यास भविष्यात मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. हा आंदोलन एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ मोबीन खान यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात स्थानिक रहिवासी व एआयएमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com