Chandrapur: पूरग्रस्त गावांच्या पाहणीकरिता केंद्रीय पथक चंद्रपूरात दाखल; नऊ गावांची पाहणी

नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Chandrpaur News
Chandrpaur NewsSaam Tv

चंद्रपूर - जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) काही तालुक्यांना पुराचा जबर फटका बसला. या पूरग्रस्त गावांची पाहणी करण्याकरीता केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने भद्रावती तालुक्यातील चारगाव, देऊळवाडा, माजरी, पळसगाव, पाटाळा,  मनगाव तर वरोरा तालुक्यातील करंजी, सोईट, दिंडोरा या गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतजमीन, पडलेली घरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा आदींची पाहणी केली.

हे देखील पाहा -

तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या केंद्रीय पथकामध्ये गृह विभागाचे संयुक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार राजीव शर्मा, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे देखरेख संचालक हरीश उंबर्जे, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे सहाय्यक संचालक मीना हुड्डा आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे संचालक डॉ. माणिकचंद्र पंडित यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. केंद्रीय पथकाने दौऱ्याची सुरुवात चारगाव येथून केली.

यावेळी त्यांनी बाधित गावातील नुकसानग्रस्त शेतजमीन, सततच्या पावसामुळे नागरिकांची पडलेली घरे तसेच घरांचे झालेले नुकसान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पोलिस स्टेशन, सभागृह, नदीनाल्याच्या प्रवाहाचे पाणी गावात येण्याचा मार्ग, नुकसानग्रस्त रस्ते आदींची पाहणी केली.

Chandrpaur News
Beed: वकिलीच्या प्रकरणात पोलिसांची टक्केवारी? 200 वकिलांचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

सततच्या पावसामुळे शेतीचे 100 टक्के नुकसान झाले आहे. खरीपासाठी बँकेचे घेतलेले कर्ज सरकारने माफ करावे, तसेच दुबार पेरणीकरीता त्वरीत कर्ज देण्यासाठी बँकांना निर्देश द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. बहुतांश गावातील नाल्यांचे खोलिकरण आणि रुंदीकरण आवश्यक आहे. तसेच वेकोलीच्या ओव्हरबर्डनमुळे सुध्दा गावात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करावा, अशा मागण्या गावक-यांनी केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com