नागपूरमध्ये Omicron ची एंट्री; पहिला रुग्ण आढळला

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (Coronavirus) ओमायक्रॉन हळूहळू राज्यभर पसरत आहे.
 नागपूरमध्ये Omicron ची एंट्री; पहिला रुग्ण आढळला
नागपूरमध्ये Omicron ची एंट्री; पहिला रुग्ण आढळलाsaam media
Published On

नागपूर : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (Coronavirus) ओमायक्रॉन हळूहळू राज्यभर पसरत आहे. मुंबई, पुण्यामागोमाग ओमायक्रॉनने नागपूर (nagpur) गाठले आहे. नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या परदेशी व्यक्तीचा रिपोर्ट ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (Omicron positive) आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आलेल्या इतर व्यक्तीचे रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आले आहे. (Omicron entry in Nagpur)

हे देखील पहा-

नागपूरमध्ये (Nagpur) ओमायक्रॉनचा (Omicron) पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण आफ्रिकेमधून (Africa) प्रवास करून नागपूरमध्ये परतला होता. तेव्हा या व्यक्तीचा कोविड (Covid) चाचणी केली असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह (Positive) आढळला होता.. त्यानंतर जीनोमसिक्वेन्सीकरिता रुग्णाचा अहवाल पाठवण्यात आला होता. आज त्या रुग्णाचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी यावेळी दिली आहे.

 नागपूरमध्ये Omicron ची एंट्री; पहिला रुग्ण आढळला
Jammu and Kashmir: अवंतीपोरात चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान

या रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्यावर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेल्या कुटुंबामधील इतर सदस्यांची कोविड चाचणी घेण्यात आली होती. मात्र, सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या आता १८ वर येऊन पोहोचवली आहे. २ दिवसाअगोदर राज्यामध्ये ७ नवीन रुग्ण आढळले होते.

मुंबईमध्ये ३ रुग्ण आढळले तर पिंपरी चिंचवडमध्ये ४ रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबई (Mumbai)मधील तिन्ही रुग्ण हे परदेशातून आले होते. या ७ रुग्णांपैकी ४ जणांनी कोरोनाची लस घेतलेली होती. तर एका व्यक्तीने एकच कोरोनाचा डोस घेतला होता. धक्कादायक म्हणजे, या ७ जणांमध्ये एका साडेतीन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या ७ जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com