Bageshwar Dham Sarkar: जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, भंडाऱ्यात बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल

Bhandara News : भंडाऱ्यात बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर येत आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा यांचं सत्संग सुरू आहे.
Police Complaint File Against Dhirendra Krishna Shastri
Police Complaint File Against Dhirendra Krishna ShastriSaam Tv

>> शुभम देशमुख

Bageshwar Dham Sarkar:

भंडाऱ्यात बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर येत आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा यांचं सत्संग सुरू आहे. त्यांनी सत्संगमध्ये मानवधर्माची शिकवण देणाऱ्या बाबा जुमदेव महाराज यांच्याविरुद्ध आक्षेपर्य विधान करत टीका केली आहे.

त्यामुळे लाखो सेवकांचे मन दुखावल्याने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये धीरेंद्र शास्त्री यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. म्हणून हजारोच्या संख्येने जुमदेव महाराज यांच्या सेवकांनी (नागरीक) मोहाडी पोलिस स्टेशन गाठले. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Police Complaint File Against Dhirendra Krishna Shastri
Nitin Gadkari: '...म्हणून आम्हाला जास्त देणग्या मिळाल्या', इलेक्टोरल बाँड्सवर नितीन गडकरी यांनी दिली प्रतिक्रिया

पोलिसांचा तगडा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते जपले आहेत. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आता पोलिस अधीक्षक यांनी आयोजक व धिरेंद्र शास्त्री यांच्या विरुद्ध 295 (अ) कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  (Latest Marathi News)

काय म्हणाले होते बागेश्वर बाबा

बागेश्वर बाबा आपल्या सत्संगमध्ये म्हणाले होते की, ''तुम्हारे पूर्वज नर्क मे है तुम्हे भी नर्क मिलेंगा.'' यावरूनच आता खूप वाद पेटला आहे. त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.

Police Complaint File Against Dhirendra Krishna Shastri
India Alliance: अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची तात्काळ सुटका करा; इंडिया आघाडीच्या या आहेत 5 मोठ्या मागण्या

बागेश्वर बाबांना अटक करा, आमदार नरेंद्र भोंडेकर यांची मागणी

दरम्यान, बागेश्वर बाबा यांनी जुमदेव महाराज यांच्याविरुद्ध आक्षेपर्य विधान केल्यानंतर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले होते आहेत की, ''बागेश्वर बाबांनी केलेल्या टिकेमुळे भंडारा जिल्ह्यातील शेकडो सेवकांनी रात्री मोहाडी पोलीस स्टेशन गाठत धिरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. तर 16 तास उलटुन देखील पोलिसांनी यावर कुठलीही कारवाही केली नाहीये.'' दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याच्या काही तासानंतर बागेश्वर बाबांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com