सोलापूर - जिल्ह्यातील वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शास्त्रकक्रियेसाठी एकच वेळी 32 महिलांना भूल देण्यात आली. मात्र भूल दिल्यानंतर तब्बल चार तास डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यासाठी उपलब्धच झाले नाहीत. शास्त्रक्रियेसाठी उशीर होत असल्याने भूल देण्यात आलेल्या महिलांना घाबरून त्रास झाल्याचं चित्र दिसून आले. तर काही महिलांना दोनदा भूल द्यावी लागली. या सर्व प्रकारामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे.
हे देखील पहा -
डॉक्टरांच्या अशा चुकीच्या वागण्यामुळे 32 महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, त्यामुळे संबंधित महिलांच्या नातेवाईककडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. या महिलांच्या नातेवाईकांनी तात्काळ संबंधित डॉक्टर्स, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवार कारवाई करण्याची मागणी केली आहे.वास्तविकता या शिबिराचे नियोजन 30 मार्चलाच करण्यात आलेले होते. त्यामुळे ठरलेली वेळ असून सुद्धा डॉक्टरांनी या 32 महिलांकडे कानाडोळा का केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.