OBC Reserevation : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवारयांनी चंद्रपुरात दिली आहे. ओबीसी आरक्षण कुठल्याही स्थितीत टिकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
OBC Reserevation : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक
OBC Reserevation : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायकSaam Tv

चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवारयांनी चंद्रपुरात दिली आहे. ओबीसी आरक्षण कुठल्याही स्थितीत टिकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. फेब्रुवारी-मार्च 2022 पर्यंत होणाऱ्या निवडणुकांसाठी एम्पिरिकल डेटा गोळा करून आरक्षण टिकवणार असल्याचा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

हे देखील पहा :

या निवडणुका चार महिने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सर्वपक्षीय भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय म्हणजे कायदाच असल्याने तो देशाला लागू झाल्याने देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले असल्याचे मत त्यांनी मांडले.

OBC Reserevation : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक
Breaking : मुख्यमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक

केंद्र सरकारने केलेली जनगणना व त्याची आकडेवारी-डेटा तातडीने राज्याला द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पुढील अल्पकालावधीत राज्य मागासवर्ग आयोग एम्पिरिकल डेटा गोळा करून हे आरक्षण टिकवण्याबाबत ठोस कृती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com