बीडमध्ये मारहाण करत नर्सवर अत्याचार ; गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ..!

बीडमध्ये 21 वर्षीय नर्सवर मारहाण करत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप, पीडित तरुणीने केलाय.
बीडमध्ये मारहाण करत नर्सवर अत्याचार ; गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ..!
बीडमध्ये मारहाण करत नर्सवर अत्याचार ; गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ..!SaamTv
Published On

विनोद जिरे

बीड - बीडमध्ये 21 वर्षीय नर्सवर मारहाण करत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप, पीडित तरुणीने केलाय. जखमी पीडित तरुणीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून न्याय न मिळाल्यास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या दारासमोर आत्मदहन करणार असल्याचा संतप्त इशारा पीडितेने दिलाय. Nurse beaten and tortured in Beed

हे देखील पहा -

नर्स असलेली पीडित तरुणी गेवराई तालुक्यातील रहिवासी असून पीडितेला वडील नाहीत. या घटनेबद्दल माहिती देताना पीडित म्हणाली कि, अतिशय गरीब परिस्थितीत आम्ही राहत आहे. मी पंधरा-सोळा वर्षाची असताना गावातीलच एका तरुणाने मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर अत्याचार केला. मात्र त्यानंतर त्याचं लग्न झालं आणि त्याच्या मामाने हे सर्व प्रकरण मिटवलं.

त्यानंतर मी शिक्षणासाठी बीडमध्ये आले. आज मी नर्स म्हणून कार्यरत आहे. मात्र आजही तो तरुण माझ्या आईला आणि भावाला मारण्याची धमकी देत आहे. गेल्या चार-पाच दिवसापूर्वी त्याने अशाचप्रकारे मला धमकावले होते. याविषयीची फिर्याद घेऊन, मी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गेले होते. मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी मला लाजिरवाणी भाषा वापरली माझ्यावरील अत्याचाराची फिर्याद घेतली नाही.

बीडमध्ये मारहाण करत नर्सवर अत्याचार ; गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ..!
पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मतदारसंघाचा विकास करणार; आमदार अभिमन्यू पवारांचा संकल्प

मात्र पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने, हा प्रकार त्या तरुणाला सांगितला. त्यानंतर तो पुन्हा माझ्या रूमवर आला आणि माझ्या आईला व भावाला जीवे मारून टाकीन म्हणत धमकी दिली. त्यानंतर त्याने मला गाडीवर बसवले आणि पाडळसिंगी टोलनाक्याजवळ आल्यावर, गाडीवरुन उडी मारली आणि मला जीवे मारण्याच्या उद्देशाने गाडी सोडून दिली.

या अपघातात मला गंभीर मार लागला असून गेल्या तीन दिवसापासून मी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र अद्यापही पोलिस कर्मचाऱ्यांनी माझा जबाब घेतला नाही, किंवा माझी विचारपूस केली नाही. त्यामुळे मला न्याय देण्यात यावा. संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करावा. जर मला न्याय नाही मिळाला, तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दारासमोर मी आत्मदहन करेल. असा टोकाचा आणि संतप्त इशारा पीडित तरुणीने दिलाय.

तर याविषयी पीडित तरुणीच्या भावाने सांगितले, कि त्या तरुणाने अनेक वेळा आम्हाला धमक्या दिल्या. त्याने माझ्या दीदीला देखील मारहाण केली आहे. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तो तरुण एका पक्षातील नेत्याचा कार्यकर्ता असल्याने पोलिस प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नसल्याचे देखील पीडितेच्या भावाने म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com