Ration Card : ‘रेशन’ची माहिती माेबाईलवर; घरबसल्या मिळणार रेशनची माहिती

याबाबतची चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
Ration card
Ration cardSaam tv
Published On

लातूर - शिधापत्रिकेवरील धान्य तुम्हाला ठरलेल्या मापात मिळतेय, याची खात्री आहे का तुम्हाला? कदाचित नसेलच. आता तुमच्यासाठी ठरलेल्या धान्याच्या कोटा आणि तुम्ही किती धान्य घेतले याचा एसएमएस तुम्हाला मिळणार आहे. याबाबतची चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने (State Government) सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांकडून होणाऱ्या मापात पापाचे वाटेकरी कोण, हे कळू शकणार आहे. परिणामी, ग्राहकांकडून होणाऱ्या तक्रारी कमी होतील, असा होरा सरकारी पातळीवर व्यक्त होत आहे.

Ration card
Nashik News : नाशिकमध्ये अग्नी तांडव सुरूच! धावत्या कंटेनरला भीषण आग

शिधापत्रिकांना कुटुंबांतील सर्वच सदस्यांचे आधार जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांमध्ये हे काम प्रगतिपथावर असून बहुतांश जिह्यात ते ९५ टक्क्यांपुढे झाले आहे. शिधापत्रिकांना आधार जोडल्याने कुटुंबातील व्यक्तीची नेमकी संख्या कळून त्यांना त्यानुसार धान्य दिले जात आहे.

Ration card
Auranagabad News : पत्नीच्या आत्महत्येची बातमी कळताच पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; काळीज पिळवटून टाकणारी घटना

महत्त्वाचे म्हणजे दुबार शिधापत्रिका असणाऱ्यांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे धान्याची बचत होऊन सरकारला हे धान्य अन्य गरजूंना देता येत आहे. याच धर्तीवर या शिधापत्रिकांना मोबाईल क्रमांक जोडण्याचे ठरविण्यात आले आहे. याबाबत ग्राहक पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात हा निर्णय तातडीने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com