MPSC च्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीची अधिसूचना जारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त पदांवरील नियुक्तीला मान्यता देण्याबाबत काल सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती.
MPSC मार्फत १५ हजार ५११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच - दत्तात्रय भरणे
MPSC मार्फत १५ हजार ५११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच - दत्तात्रय भरणेSaamTv
Published On

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सदस्यांच्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीस राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिलेल्या मान्यतेनुसार तीन सदस्यांच्या नेमणुकीच्या अधिसूचना आज जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त पदांवरील नियुक्तीला मान्यता देण्याबाबत काल सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती.  

हे देखील पहा -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ.प्रताप रामचंद्र दिघावकर डॉ.देवानंद बाबुराव शिंदे आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (496 पदे), महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा परीक्षा (435 पदे), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा (1 हजार 145 पदे), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा (16 पदे), महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (100 पदे), याप्रमाणे एकूण 2 हजार 192 पदांसाठी एकूण 6 हजार 998 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत.

यापैकी 377 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. उर्वरित 6 हजार 621 उमेदवारांच्या मुलाखती होणे बाकी आहे. आता या सदस्य नियुक्तीमुळे या भरतीप्रक्रियेस गती मिळणार असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

MPSC मार्फत १५ हजार ५११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच - दत्तात्रय भरणे
यवतमाळमध्ये एसटी चालक-वाहक प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण

पुढे बोलताना भरणे म्हणाले, केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या वाढवण्याच्या अनुषंगानेही राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत बैठकीत चर्चा झाली आहे. आयोगाच्या एक सदस्यांचा कार्यकाल लवकरच पूर्ण होत असून त्यांची रिक्त होणारी जागा भरण्यासाठीही लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे राज्यपालांना सांगितले. हे दोन्ही प्रस्ताव प्राप्त झाल्यावर त्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com