यवतमाळमध्ये एसटी चालक-वाहक प्रशिक्षणार्थींचे आमरण उपोषण

एसटीमध्ये चालक-वाहक या पदावर घेण्यासाठी आदिवासी समाजातील युवकांना पांढरकवडा येथील चालक-वाहक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर नोकरी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन एसटीच्या मुंबई कार्यालयाने दिले होते.
यवतमाळमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण
यवतमाळमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषणसंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ : एसटीमध्ये चालक-वाहक या पदावर घेण्यासाठी आदिवासी समाजातील युवकांना पांढरकवडा येथील चालक-वाहक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर नोकरी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई कार्यालयाने दिले होते. मात्र, सात वर्षांचा कालावधी उलटून गेला असूनही त्यांना कामावर रुजू करून न घेतल्यामुळे प्रशिक्षित झालेल्या चालक-वाहकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. 

हे देखील पहा -

एसटीमध्ये चालक वाहक भरती करण्यापूर्वी पांढरकवडा येथील चालक वाहक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण देण्यापूर्वी आरक्षणांतर्गत या बेरोजगारांना नियमावलीत विहित नमुन्यात अर्ज भरून मागितला जातो. हा अर्ज भरून दिल्यानंतर त्यांच्या रीतसर मुलाखती घेतल्या जातात आणि मुलाखती घेतल्या नंतर त्यांना प्रशिक्षण दिले जाते.

पांढरकवडा येथील प्रशिक्षण केंद्रातून 180 चालक-वाहक प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यांना सक्षम झाल्याचे प्रमाणपत्र पांढरकवडा येथील प्रशिक्षण केंद्रातून मिळाले. एसटी महामंडळाने चालक वाहकांची चाचणी घेऊन कामावर घेण्याचे निश्चित केले होते. मात्र 2014 ते 17 या कालावधीत या बेरोजगारांना कामावर घेतले नाही. अर्ज विनंती सर्व केल्यानंतरही एसटी महामंडळ प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे.

यवतमाळमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण
सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत - सतेज पाटील

आता 2021 चा ऑगस्ट महिना सुरू आहे 2014 ते 2019 या कालखंडात बेरोजगारांना नोकरी न दिल्यामुळे त्यांनी एसटी प्रशासन जिल्हाधिकारी आणि मुंबईचे मध्यवर्ती कार्यालयांना आत्मदहनाचा ची परवानगी मागितली होती. मात्र हा निर्णय मागे घेऊन 5 ऑगस्ट पासून आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com