Jalna News: लसीकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या 17 आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस

तीन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश....
Jalna Health News in Marathi
Jalna Health News in Marathiलक्ष्मण सोळुंके
Published On

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यात ओमिक्रोनचा (Omicron) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शासनाने लसीकरण मोहिमेला (Vaccination) गती दिलेली आहे. मात्र या लसीकरणात मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्या जिल्ह्यातील तीन तालुका आरोग्य अधिकाऱ्यां सह 14 वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्याने जिल्हा आरोग्य विभागात एकाच खबळ उडाली आहे. त्यामुळे यामुळे आरोग्य विभागातील बेशिस्त कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Jalna Local News Updates)

एकीकडे कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रोनने राज्यात वेगाने शिरकाव केला आहे,त्यातच जिल्ह्यातही या विषाणूचा रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सोमवारीच याबाबत आरोग्य विभागाला सतर्कतेचे राहण्याचे आदेश दिले आहेत.

Jalna Health News in Marathi
Jammu-Kashmir मध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले संशयित ड्रोन!

जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी शासनाकडून कसोटीचे प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील लसीकरण वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांवर (Health Center) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. (Jalna News in Marathi)

हे देखील पहा-

दरम्यान, लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी आणि काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई करत कमालीचा हलगर्जीपणा असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अंबड, मंठा, घनसावंगी येथील तालुका आरोग्य अधिकारी तसेच गोंदी, शहागड, सुखापुरी, वाकुळणी, सोमठाणा, राजूर, राजा टाकळी, डोंणगाव खासगाव, वरुड, रामनगर, तळणी, ढोकसाळ, पाटोदा या 14 आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावली आहे.

शिवाय, तीन दिवसांत लेखी स्वरूपात खुलासा सादर करण्याचे आदेश ही या नोटीशीत देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Jalna news today)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com