नाशकात 'नो हेल्मेट नो पेट्रोल' या मोहिमेचा शुभारंभ

मोहिमेचा शुभारंभ आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते
नाशकात 'नो हेल्मेट नो पेट्रोल' या मोहिमेचा शुभारंभ
नाशकात 'नो हेल्मेट नो पेट्रोल' या मोहिमेचा शुभारंभसागर गायकवाड
Published On

नाशिक - नो हेल्मेट Helmet नो पेट्रोल Petrol या मोहिमेचा शुभारंभ आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिकच्या Nashik गंगापूर Gangapur रोड येथील सद्भावना पेट्रोल पंप Petrol Pump या ठिकानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहरात हेल्मेट सक्ती व्हावी या साठी पोलीस आयुक्त दीपक पांडे Deepak Pande यांच्या संकल्पनेतून "नो हेल्मेट, नो पेट्रोल " ही संकल्पना राबविली जात आहे.

आजपासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर ज्या दुचाकी चालकाने हेल्मेट परिधान केले नसेल त्यांना पेट्रोल दिले जाणार नसल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत पोलीस आयुक्त यांनी शहरातील सर्व पेट्रोल पंप मालक संचालक यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचना केल्या आहेत.

हे देखील पहा -

शहरातील रस्ते अपघात यापूर्वी अनेक दुचाकी चालकांना हेल्मेट नसल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.असे प्रकार पुन्हा घडू नये व शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी ही संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे.आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते "नो हेल्मेट नो पेट्रोल" या कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. यावेळी पालकमंत्री आणि उपस्थित मान्यवारांच्या हस्ते पोलिस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना हेल्मेट देऊन या उपक्रमाची आधी आपल्या खात्यापासून सुरुवात करण्यात आली आहे.

या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देखील पोलिस आयुक्त यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देत कौतुक केले. तसेच नागरिकांनी देखील या मोहिमेला सहकार्य करून आपला जीव धोक्यात न घालता दुचाकीवरून जात असताना हेल्मेट घालावे असे आव्हाहन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ,महापालिका आयुक्त कैलास जाधव ,पोलिस आयुक्त दीपक पांडे, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

नाशकात 'नो हेल्मेट नो पेट्रोल' या मोहिमेचा शुभारंभ
धक्कादायक : शेतकऱ्याचा मंत्रालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

त्यामुळे आता या पुढे नागरिकांना आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरायचे असेल तर हेल्मेट परिधान करावेच लागणार आहे. अन्यथा आपल्याला पेट्रोल मिळणार नाही. जर कुणी यावेळी पेट्रोल पंप वर हुज्जत घालेल तर त्याला पोलीस कार्यवाईला देखील सामोरे जावे लागणार आहे. याआधी देखील नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती बाबत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहे. मात्र नाशिककरांनी त्याला प्रतिसाद दिला नाही आणि हे उपक्रम फोल ठरले. त्यामुळे आज पासून पोलीस आयुक्तांच्या "नो हेल्मेट,नी पेट्रोल" या मोहिमेला कसा प्रतिसाद भेटतो हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com