Nitin Gadkari: देशात १०,००० किमीचे ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारणार, नितीन गडकरींची घोषणा; खर्च किती?

Nitin Gadkari Annoucement: भारतात रस्ते वाहतूकीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आता १०,००० किमी लांबीचे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बांधण्याची घोषणा केली आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSaam Tv
Published On

देशातील रस्ते वाहतूकीचा विकास होताना दिसत आहे. देशात अनेक ठिकाणी हायवे, एक्सप्रेस वेचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामुळे देशातील अनेक राज्ये जोडली जाणार आहे. दरम्यान, आता याबाबत अजून एक मोठी घोषणा नितीन गडकरींनी केली आहे. सरकार देशभरात एकूण १०,००० किमी लांबीचे २५ ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे बांधत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या कामासाठी सुमारे ६ लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्त्व नाही, आम्हाला आरक्षण नाहीये हे परमेश्वराचे उपकार - नितीन गडकरी

पीएचडीसीसीआयच्या कार्यक्रमात नितीन गडकरींनी याबाबत माहिती दिली आहे. लडाख प्रदेश आणि देशाच्या अनेक भागांमध्ये सर्व हवामानासाठी उत्तम असलेल्या धोरणात्मक झोजिला बोगद्याचे काम ७५ ते ८० टक्के पूर्ण झाले आहे. जर या रस्ते प्रकल्पांचे चलनीकरण झाले तर त्यांना १५ लाख कोटी रुपये मिळतील.

पीएचडीसीसीआयच्या कार्यक्रमात नितीन गडकरींनी याबाबत माहिती दिली आहे. लडाख प्रदेश आणि देशाच्या अनेक भागांमध्ये सर्व हवामानासाठी उत्तम असलेल्या धोरणात्मक झोजिला बोगद्याचे काम ७५ ते ८० टक्के पूर्ण झाले आहे. जर या रस्ते प्रकल्पांचे चलनीकरण झाले तर त्यांना १५ लाख कोटी रुपये मिळतील.

Nitin Gadkari
लय भारी! FASTag नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा, नवा नियम होणार लागू

नितीन गडकरी यांनी म्हटले की, एक्सप्रेस वे आणि कॉरिडोरच्या बांधकामामुळे लॉजिस्टिकचा खर्च १६ टक्क्यांवरुन १० टक्के झाला आहे. डिसेंबरपर्यंत हा खर्च अजून कमी होईल. हा खर्च ९ टक्क्यांपर्यंत येईल, ज्यामुळे भारत हा इतरांच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक बनण्यास मदत होईल. अमेरिकेत लॉजस्टिकचा खर्च १२ टक्के, युरोपीय देशांमध्ये १२ टक्के तर चीनमध्ये ८ ते १० टक्के आहे. त्या तुलनेने भारतात हा खर्च कमी आहे.

या पाच वर्षात भारताला ऑटोमोबाईल क्षेत्रात जगात नंबर १ बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. मी जेव्हा पदभार स्विकारला तेव्हा ऑटोमोबाईल उद्योगाचा विस्तार १४लाख कोटी रुपये होता. आता हा २२ लाख कोटी झाला आहे.यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळतो, असं नितीन गडकरींनी सांगितलं.

Nitin Gadkari
Government Scheme: २१ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये जमा; नेमकी योजना आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com